Latest Posts

गडचिरोली येथील अपर्णा गडप्पा नागपूर विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : येथील कॅम्प एरिया रहिवासी असलेल्या अपर्णा आनंद गडप्पा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या रसायनशास्त्र पदवीच्या गुणवत्ता यादीत झळकल्या आहेत.

नागपूर हिस्लॉप कॉलेज येथिल विद्यार्थिनी असलेल्या अपर्णा गडप्पा यांनी नुकतेच नागपूर विद्यापीठाने जाहीर केलेल्या रसायनशास्त्र गुणवत्ता यादीत चौथ्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे. या निमित्ताने महाविद्यालयाने आयोजित केलेल्या मेरीट धारक विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात अपर्णा गडप्पा यांचा गौरव करण्यात आला.

यशाबद्दल हिस्लॉप कॉलेज नागपूर चे प्राचार्य डॉ. प्रशांत शेलके, विभाग प्रमुख  डॉ. प्रतिक माइकल, डॉ. शुभाजीत हलदार आदींनी कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा मानस तिने व्यक्त केला आहे.

Latest Posts

Don't Miss