Latest Posts

नियमांत मोठा महत्त्वाचा बदल : पीपीएफ खातेधारकांना सरकारकडून मोठा दिलासा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : तुमचेही पीपीएफ खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पीपीएफ खाते मॅच्युरिटीपूर्वी बंद करण्याच्या नियमांमध्ये मोदी सरकारने महत्त्वाचे बदल केले आहेत. नवीन नियमांमध्ये, वाढीव कालावधीची पीपीएफ खाती वेळेपूर्वी बंद करण्यासाठी लागणाऱ्या दंडामध्ये दिलासा दिला आहे.

हा बदल ९ नोव्हेंबर २०२३ पासून अंमलात आला असून त्याला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (सुधारणा) योजना २०२३ असे नाव देण्यात आले आहे.

पीपीएफ खाते १५ वर्षापूर्वी बंद केल्यास दंडाबाबतचे नियम स्पष्ट होते, परंतु खातं कालावधी वाढवण्याबाबत संभ्रम होता. जुन्या नियमांनुसार (PPF २०१९), जर एखाद्याने वाढीव कालावधीत खाते बंद केले तर खात्याचा कालावधी वाढवल्यापासून दंड भरावा लागत होता. म्हणजेच, जर एखाद्या गुंतवणूकदाराने पीपीएफ खाते १५ वर्षानंतर ५ वर्षांसाठी एकापेक्षा जास्त वेळा वाढवले ​​असेल, तर पीपीएफ खाते पहिल्यांदा वाढवल्यापासून दंड आकारला जायचा.

नव्या नियमांत काय?
नवीन नियमांमध्ये, असे स्पष्ट करण्यात आलेय की, जर गुंतवणूकदाराने प्रत्येकी पाच वर्षांसाठी खात्याचा कालावधी तीन वेळा वाढवला असेल, तर प्रथम खात्याचा कालावधी वाढवल्यापासून एक टक्का दंड आकारला जाणार नाही. त्याऐवजी, ज्या पाच वर्षांमध्ये खाते मुदतपूर्व बंद करण्याचा अर्ज देण्यात आला आहे, त्या पाच वर्षांसाठीच ती गणना केली जाईल.

किती कपात –
नियमांनुसार, मॅच्युरिटी कालावधीपूर्वी खाते बंद केल्यास, व्याजात एक टक्के कपात केली जाते, जी खाते उघडल्याच्या तारखेपासून लागू होते. जर एखाद्या व्यक्तीला चालू योगदानावर ७.१ टक्के व्याज मिळत असेल, परंतु जर त्याने खाते वेळेपूर्वी बंद केले तर त्याला फक्त ६.१ टक्क्यानुसार व्याज मिळेल.

Latest Posts

Don't Miss