Latest Posts

चंद्रपुर च्या प्रदूषणात डिसेंबरमध्ये पुन्हा वाढ

– शहरात ३१ दिवसा पैकी २२ दिवस तर औद्योगिक क्षेत्रात ३१ पैकी २७ दिवस जास्त प्रदूषण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : आधीच प्रदुषित असलेल्या चंद्रपुर मध्ये हिवाळ्यात प्रदूषणात पुन्हा वाढ झाली आहे. परंतु ऑक्टोबर, नोव्हेंबर प्रमाणे डिसेंबर मध्ये सुध्दा प्रदुषित वाढले. डिसेंबर मध्ये पाउस सदृश हवामान असून सुध्दा येथे प्रदूषनात पुन्हा वाढ झाल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी वरून लक्षात येते. विशेष म्हणजे सुक्ष्म धूलिकनाचे वाढलेले प्रदूषण आरोग्यासाठी धोकादायक आहे. डिसेंबर  महिन्याच्या एकूण ३१ दिवसापैकीं चंद्रपुर शहरातील २२ दिवस तर खुंटाळा येथे २७ दिवस जास्त प्रदुषित होते.

धोक्याची बाब म्हणजे शहरात तीन दिवस आणि खुंटाळा येथे पाच दिवस  धोकादायक प्रदूषण आढळले अशी माहिती पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

शहरातील प्रदूषण निर्देशांक –
०- ५० AQI (Good) निर्देशांक आरोग्यासाठी चांगला मानला जातो. असा येथे ०१ दिवस होता. ५१-१०० AQI (Satisfactory) निर्देशांक हा समाधानकारक प्रदूषण मानले जाते. असे येथे ०७ दिवस आढळले. १०१- २०० AQI (Moderate) निर्देशांक सर्वसाधारण प्रदूषित श्रेणीत येतो. असे येथे १५ दिवस आढळले. २०१- ३०० AQI (Poor) निर्देशांक असून जास्त प्रदुषित मानला जातो. असे ०५ दिवस आढळले. ३०१-४०० AQI(Very Poor) निर्देशांक हा अति प्रदूषित मनाला जातो-असे येथे ०३ दिवस आढळले. ४०१-५०० AQI (Severe) निर्देशांक हे धोकादायक प्रदूषण मानले जाते. हे प्रदूषण येथे आढळले नाही.

खुटाळा ह्या औद्योगिक क्षेत्रात महिन्यात एकूण २७ दिवस प्रदूषण आढळले. तिथे चांगले आणि समाधान कारक दिवस ०३, साधारण प्रदुशीत १६ दिवस, जास्त प्रदुषित ०६ तर अतिशय प्रदुषित ०५ दिवस आढळले.

हवा गुणवत्ता निर्देशांक काढण्यासाठी कमीत कमी ३ तर जास्तीत जास्त ८ प्रदूषकांना प्रमाण मानले जाते. त्यात धूलिकण, २.५, १० ओझोन, कार्बन मोनोकसाईड, सल्फर डाय ओकसाईड, नायट्रोजन डाय ओकसाईड, अमोनिया, लीड या प्रदूषकांना मिळून निर्देशांक काढला जातो.

प्रदूषनाची कारणे –
वाहनांची वाढती संख्या, त्यातून निघनारा धूर, धूळ, रस्त्यावरील धूळ, कचरा ज्वलन, बांधकाम, स्थानिक थर्मल पॉवर उद्योग, इत्यादी अनेक कारणांमुळे अलीकडे सर्वत्र प्रदूषनात मोठी वाढ झाली असून त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रत्येक शहरात अलीकडे विकासासाठी विविध बांधकाम, रस्ते बांधणे सुरू असते त्यातच वाहनाच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर धूळ आणि धूर बाहेर पडते. बहुतेक शहरात सुद्धा अश्याच समस्या निर्माण होत असल्याने प्रदूषणात सतत वाढ होत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी वरून लक्षात येते.

प्रदूषणामुळे रोगराईत वाढ –
हिवाळ्यात दरवर्षी प्रदूषण वाढते. थंडी मुळे आणि संथ वाऱ्या मुळे प्रदूषके वाहून न जाता एकाच ठिकाणी जमिनीवर स्थिर होतात. पूर्वी हिवाळा आरोग्यासाठी चागला मानला जात असे परंतु अलीकडे प्रदूषणामुळे तो धोकादायक ठरत आहे. प्रदूषणामुळे आधिच श्वसनाच्या रोग् असणाऱ्या ना हानिकारक असते, तसेच नव्याने श्वसनाचे रोग वाढू शकतात. दमा, ब्रॉकाय टिस, टीबी, हृदय रोग आणि मानसिक रोग वाढतात.

प्रदूषण नियंत्रण कसे होणार –
अलीकडे औद्योगिक क्षेत्रात सर्वाधिक प्रदूषण असले तरी महाराष्ट्रात सर्वच जील्ह्यात प्रदूषण वाढले आहे. वाढती वाहने, धुळीचे रस्ते, कचरा ज्वलन, कोळसा ज्वलन आणि शहरातील व्यावसाईक प्रतिष्ठाण कारणीभूत असतात.

हे प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी वृक्षसंख्येत वाढ करणे, शहरात सायकल चा उपयोग वाढविणे, बेटरी वर चालणारी वाहने वाढविणे, सार्वजनिक वाहने वापरने, वाहनांच्या संख्येत घट करणे, कचरा न इळणे, उदयोगांणी प्रदूषण रोखणे, नागरिकांनी सुद्धा प्रदूषण होऊ नये अश्या उपाययोजना करणे, स्मोग टॉवर्स, फॉग मशीन किंवा कृत्रिम पाऊस हे तात्पुरते उपाय आहेत. प्रशासनाणे कडक  उपाय योजना राबवून प्रदूषण स्रोत कमी करावे, तरच प्रदूषनावर नियंत्रण होऊ शकेल असे प्रा. सुरेश चोपणे पर्यावरण अभ्यासक यांनी म्हंटले आहे.

Latest Posts

Don't Miss