Latest Posts

राज्यात २ हजार ३६९ ग्रामपंचायतींत ७४ टक्के मतदान : आज मतमोजणी पार पडणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : राज्यातील २ हजार ३६९ ग्रामपंचायतींमधील २ हजार ९५० सदस्यपदे, तसेच १३० सरपंचपदांसाठी रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान पार पडले. काही ग्रामपंचायतींत बिनविरोध निवडणूक झाली असली तरी या निवडणुकीत सरासरी ७४ टक्के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक आयोगाने वर्तविला आहे.

नक्षलग्रस्त भाग वगळता अन्य ग्रामपंचायतींची सोमवारी मतमोजणी पार पडणार आहे.

गडचिरोली, गोंदियात मतमाेजणी ७ राेजी –
गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागांत सकाळी साडेसात ते दुपारी तीन या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडली. येथे मात्र ७ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. शांततेत मतदान पार पडले आहे.

Latest Posts

Don't Miss