Latest Posts

राज्यात ४ कोटी ४४ लाख १६ हजार ८१४ महिला मतदार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : लोकसभा निवडणुकीच्या मतदानात यंदा महिलाशक्ती निर्णायक ठरणार आहे. मागील वर्षात राज्यात मतदारांची संख्या लक्षणीय वाढली असून आता राज्यात ४ कोटी ४४ लाख १६ हजार ८१४ महिला मतदार आहेत.

मागील चार निवडणुकांच्या तुलनेत यावर्षी १ हजार पुरुषांमागे ९२३ महिला अशी लक्षणीय वाढ झाली आहे.

२००४, २००९, २०१४ आणि २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये महिला मतदारांची संख्या वाढली आहे. राज्यात २००४ मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आलेली नव्हती. त्यावर्षी एकूण ३ कोटी ४२ लाख ६३ हजार ३१७ मतदारांची नोंदणी झाली. २००९ आणि २०१४ या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी होती मात्र २०१९ मध्ये मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून पुरुष मतदारांची संख्या ५१.४ लाखांनी म्हणजे १२ टक्क्यांनी वाढली, तर महिला मतदारांची संख्या ६२ लाखांनी म्हणजे १६.३ टक्यांनी वाढली आहे.

Latest Posts

Don't Miss