– माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घटनास्थाळी भेट व आर्थिक मदत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / मूलचेरा (Mulchera) : तालुक्यातील कोडसापूर येथील वाघाच्या हाल्या आणखी एक महिला ठार झाल्याची घटना सोमवारी (१५ जानेवारी) रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. रमा शंकर मुंजमकर (५५) असे महिलेचे नाव आहे.
माहितीनुसार, रमाबाई शंकर मुंजमकर या कोळसापुर येथील आपल्या राहत्या घरालगत कापूस वेचणी करत असताना वाघाने अचानक हल्ला करत तिला लगतच्या जंगलातच म्हणजे रेंगेवाही उपक्षेत्रातील कोपरअली बिट मधील खंड क्रमांक १५२५ मध्ये जवळपास २०० मीटर फरफटत नेले. विशेष म्हणजे वाघाने त्या महिलेचा डावा हात पूर्णपणे खाल्ले असून मानेवर खूप मोठा जखम असल्याची माहिती आहे.
आविसं- काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून आविसं- काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना देतच वेळेचे विलंब ना करता तात्काळ घटना स्थाळी धाव घेतले. त्यांचे नातेवाईकांना भेट घेऊन घटनाची माहिती जाणून घेतले आहे.
माजी जि.प. अध्यक्ष कंकडालवार यांनी रुग्णालयत पोस्ट माडम आणि शव घरी पोहचे पर्यंत, सांत्वन कार्यक्रम होईल पर्यंत, नातेवाईकांनसोबत राहून त्या कुटुंबियांना सांत्वन करत आर्थिक मदत केली.
यावेळी आविसं काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.