Latest Posts

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी फुले दाम्पत्य प्रतिष्ठान गडचिरोली येथे अभ्यासिकाचे उदघाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : ३ जानेवारी २०२४ रोजी क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १९२ व्या जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. तसेच, या निमित्याने फुले दाम्पत्य प्रतिष्ठान संस्थेच्या सार्वजनिक अभ्यासिका@वाचनालयाचे संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करुन उद्घाटन लोकार्पन करण्यात आले.

कार्यक्रम अध्यक्ष योगेश सोनुले, उपाध्यक्ष फु.दा.प्र.वि.सं.गडचिरोली, कार्यक्रमाचे उद्घाटक फुलचंद गुरनुले, अध्यक्ष गडचिरोली जिल्हा माळी समाज संघटना, प्रमुख पाहुणे म्हूणन शिवदास मोहुर्ले रा.करंजी ता.माहुर जि.नांदेड होते.

यावेळी हरिदास कोटरंगे यांनी उपस्थितांकडुन संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करुन घेतले. पुरुषोत्तम लेनगुरे यांनी अभ्यासिकेचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीत सर्व सुखदेव जेंगठे, किरण शेंडे, प्रविण मोहुर्ले, किशोर सोनुले, सुरज मांदाडे, चिमुकले कियांश सोनुले, प्रज्वल व मृणाल लेनगुरे, स्वरा मोहुर्ले, कांता लोनबले, प्रभा सोनुले, सारिका लोनबले यांनी उपस्थित राहुन सहकार्य केले.

Latest Posts

Don't Miss