Latest Posts

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट, व्हॉलीबॉल व कबड्डी स्पर्धेचे उदघाटन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड (Bhamragad) : तालुक्यातील जुव्वी येथील भव्य ग्रामीण क्रिकेट – कबड्डी – व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटक म्हणून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते पार पडले.  यावेळी माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचा गावकऱ्यांनी रॅली कडून माडिया भाषेत गाणं गाऊन जंगी स्वागत केले. आणि माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते सप्तरंगी झेंडांचे ध्वाजरोहण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ऍड.लालसू नोगोटी, लक्ष्मीकांत बोगामी, रमेश पुंगाटी सरपंच ग्रा.प.धोडराज – प्रमुख पाहुणे म्हणून लालसू आत्राम माजी उपसभापती प.स.भामरागड, सुधाकर तिम्मा तालुकाध्यक्ष आविसं अजयभाऊ मित्र परीवार, शामराव येलेकरवार, गोगलु पुंगाटी, गणेश उराडे होते.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, बावरसाय मांजी, राजू कडंगा, जीवन मडकामी, सतु मटामी, राकेश सडमेक मंडळाचे अध्यक्ष-चुक्कु पुंगाटी, उपाध्यक्ष-पुसू पुंगाटी, सहसचिव-पेडू मज्जी, सचिव-लालसू पुंगाटी, कोषाध्यक्ष-मंगरू कुडयामी, सहकोषाध्यक्ष-मादी पुंगाटी होते. तर क्रीडा व्यवस्थापक-सुरेश पुंगाटी, देवाजी मुहंदा, लचु पुंगाटी, झुरू पुंगाटी, पांडू पुंगाटी, कोमटी पल्लो, साधू बारसा, रमेश पुंगाटी, दानसु पुंगाटी, गणेश पुंगाटी, संजू कोरसामी, लोचन पुंगाटी, राकेश पुंगाटी, शिवेंद्र कुडयामी, विष्णू पुंगाटी, प्रवीण पुंगाटी, प्रवीण पुंगाटी, भास्कर मज्जी, पेडू मज्जी, राजेश पुंगाटी, लालसू पुंगाटी, निलेश पुंगाटी, संजय पुंगाटी, शंकर पुंगाटी, राकेश कुडयामी, कोलु पुसाली तसेच आ.वि.स तथा अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Latest Posts

Don't Miss