Latest Posts

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते नवीन वर्ग खोलीचे लोकार्पण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील वांगेपल्ली ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या मौजा किष्टापुर(वा) येथील वर्ग खोली नसल्याने बालकांना शिक्षण घेण्यासाठी अडचण भासत होते. हि बाब वांगेपल्ली येथील सरपंच दिलीप मडावी व नागरिक-आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्त्यांडून माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना अहेरी जनसंपर्क कार्यालय येते भेट घेऊन अजयभाऊंना सांगण्यात आली आहे.

नागरिकांची मागणी लक्षात घेऊन जिल्हा परिषद बांधकाम विभाग गडचिरोली अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ अंतर्गत वांगेपल्ली येथे जिल्हा परिषद शाळेच्या नवीन वर्ग खोली मंजूर करून दिले होते.

सदर वर्ग खोलीची काम पूर्णत्वास झाल्याने आज आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आली आहे. वांगेपल्ली येथील समस्त नागरिक अजय कंकडालवार यांचे आभार मानले.

यावेळी सरपंच दिलीप मडावी, ग्रामपंचायत सदस्य कल्पना मडावी, नरेंद्र गर्गम, संतोष येरमे, केंद्र प्रमुख चीलवेलवार, राहुडकर, चलकेलवार, कारेंगुलवार मॅडम,पोषालू भोयर, यशवंत मडावी, बालाजी आलाम, बाबूराव नागपुरे, दिलीप पिपरे, महेश नैताम, प्रमोद गोडशेलवार, व्यंकटेश कासंगटुवार, गणेश मडावी, सोमा नैताम, राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते व शाळेचे शिक्षकवृंद तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss