विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (New Delhi) : जगभरातील सायबर क्राईम तज्ज्ञांच्या एका नव्या संशोधनानुसार, सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत भारत १०० देशांत दहाव्या क्रमांकावर आहे. यामध्ये ॲडव्हान्स फी भरण्याशी संबंधित फसवणूक हा सर्वात सामान्य गुन्हा असल्याचे सांगण्यात आले.
तज्ज्ञांनी ‘वर्ल्ड सायबर क्राइम इंडेक्स’ जाहीर केला आहे. यात रशिया अव्वल, युक्रेन दुसऱ्या आणि चीन तिसऱ्या स्थानावर आहे. अहवालात, रॅन्समवेअर, क्रेडिट कार्ड चोरी आणि फसवणूक यासह सायबर गुन्ह्यांच्या विविध श्रेणींनुसार मुख्य हॉटस्पॉट ओळखले गेले आहेत.
रशियामध्ये सर्वाधिक सायबर क्राइम ;
वर्ल्ड सायबर क्राइम इंडेक्स मध्ये सायबर गुन्ह्यांच्या आधारे स्कोअर देण्यात आला आहे. मात्र यात एकूण प्रकरणांची संख्या देण्यात आलेली नाही. रशियाचा जागतिक सायबर क्राइम इंडेक्स स्कोअर १०० पैकी ५८.३९, युक्रेनचा ३६.४४ आणि चीनचा २७.८६ होता. भारताचा स्कोअर ६.१३ आहे.
या १० देशांमध्ये सायबर क्राइम सर्वाधिक :
देश स्कोअर
रशिया – ५८.३९
युक्रेन – ३६.४४
चीन – २७.८६
अमेरिका – २५.०१
नायजेरिया – २१.२८
रोमानिया – १४.८३
उत्तर कोरिया – १०.६१
इग्लंड – ९.०१
ब्राझील – ८.९३
भारत – ६.१३
गुन्ह्याचा जागतिक अभ्यास :
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि न्यू साऊथ वेल्स विद्यापीठातील तज्ज्ञांनी सायबर गुन्ह्याचा जागतिक अभ्यास केला. याआधारे निर्देशांक तयार करण्यात आला. हा अभ्यास पाच मुख्य सायबर गुन्ह्यांवर केंद्रित होता. या तज्ज्ञांनी प्रत्येक सायबर क्राइम श्रेणीचे प्राथमिक स्त्रोत मानलेले देश ओळखले.
सायबर गुन्ह्यांचे प्रमुख ५ प्रकार :
– तांत्रिक उत्पादने किंवा सेवा : मालवेअर कोडिंग, बॉटनेट ॲक्सेस, सिस्टीममध्ये प्रवेश
– खंडणी : सेवा देण्यास नकार, सिस्टीम हॅक करणे आणि रॅन्समवेअर
– डेटा किंवा ओळख चोरी : हॅकिंग, फिशिंग, क्रेडिट कार्ड
– स्कॅम : ॲडव्हान्स शुल्क घेत फसवणूक, बिझनेस ईमेल, ऑनलाइन लिलाव
– रोख पैसे काढणे किंवा मनी लॉन्ड्रिंग : क्रेडिट कार्डने फसवणूक, अवैध आभासी चलन प्लॅटफॉर्म