Latest Posts

भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदल मध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसएच या परीक्षेची पूर्व तयारी करून घेणेसाठी छात्र पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फ महाराष्ट्रातील युवक व युवतीसाठी १४ से २३ ऑक्टोबर या कालावधीत एसएसबी कोर्स क्रमांक ५८ चेआयोजन करण्यात येत आहे. एसएसबी कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.

इच्छु‌क उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नागपूर येथे ४ ऑक्टोबर २०२४ रोजी मुलाखतीस हजर राहावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी training. petenashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ किंवा व्हॉट्सअप क्र. ९१५६०७३३०६ असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नागपूर यानी केले आहे

Latest Posts

Don't Miss