Latest Posts

भारतीय जनता पार्टी एटापल्ली तर्फे कार्यकर्ता बैठक संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली (Etapalli) : राजमाता राजकुवर बाई विद्यालय एटापल्ली येथे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघरे व जिल्हा महामंत्री रवी ओल्लालवार, दिपक सातपुते यांच्या उपस्थितीत १५ ऑगस्ट २०२३ रोजी बैठक घेण्यात आली.

आगामी जि.प. व प.स. तसेच लोकसभा, विधानसभा निवडणुकीत बाबत मार्गदर्शन केले, तसेच शक्ति केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, पन्ना प्रमुख व वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते यांना प्रत्येक बुथ नविन समिती स्थापन करणेबाबत माहिती देण्यात आली. तसेच प्रशांत वाघरे, रवी ओल्लालवार, बाबुराव गंपावार, प्रशांत आत्राम, दामोदर नरोटे यांनी बैठकीला मार्गदर्शन केले.

यावेळी भारतीय जनता पार्टी एटापल्ली बाबला मजुमदार, मोहन नामेवार, गजु खापने, उस्सणा मेडीवार, बासु गावडे, महागुराम उसेंडी, नितीन तोडेवार, विनोद नरोटे, प्रसाद पुल्लुरवार, निखिल गादेवार, सुमीत करमरकर व व्यापारी संघटनाचे सदस्य तसेच भारतीय जनता पार्टी एटापल्ली चे पदाधिकारी व कार्यकर्ते ईतर सदस्य मोठ्या प्रमाणात होते.

Latest Posts

Don't Miss