विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : महाराष्ट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करून सुरजागड लोहखाणीसह लॅायड्स मेटल्सच्या स्टिल प्लान्टला भेट दिली.
लोहखाणींवर आधारित औद्योगिक विकासामुळे गडचिरोली जिल्ह्याचे चित्र पूर्णपणे बदलेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. याशिवाय बेरोजगारीमुळे नक्षलवादाकडे वळलेल्या तरुणांच्या हाताला काम मिळून नक्षलवादाची समस्याही दूर होईल, असे अजितदादा म्हणाले.
यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.