विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : मित्र या संस्थेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध असून जिल्हयातील जास्तीत जास्त रोजगार इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.
इस्राईलमध्ये ५ हजार होम बेस्ड हेल्थ गिव्हर वर्कर्सची आवश्यकता आहे. त्याकरीता २५ ते ४५ वर्षे वयोगटातील उमेदवारांची शैक्षणिक पात्रता एएनएम, जीएनएम व बीएससी नर्सिंग असावी. त्यामध्ये ९० टक्के महिलांसाठी आणि १० टक्के पुरूषांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध आहे.
पात्रताधारक उमेदवारांनी https://maharashtrainternational.com/candidates.aspx या संकेतस्थळावर जाऊन फॉर कॅन्डीडेड या टॅब वर क्लिक करा आणि अप्लाय हियर या टॅबवर क्लिक करून जॉब डिस्क्रिप्शन वाचावे. पात्रताधारक व नोकरी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा. अधिक माहितीसाठी +९१२२३५५ ४३०९९ या क्रमांकावर किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत क्र. २, दुसरा माळा (विंग-ए), सिव्हिल लाईन्स, नागपूर -४४०००१ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.