Latest Posts

इस्रो ची आणखी एक झेप : आता हा उपग्रह देणार हवामानाचा अचूक अंदाज

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : अवकाश संशोधन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या इस्रोने आणखी एक मोठी झेप घेतली आहे. इस्रोने शनिवारी हवामानाचा अचूक अंदाज देणाऱ्या INSAT- 3DS या उपग्रहाचे प्रक्षेपण केले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सायंकाळी 5:35 वाजता प्रक्षेपण करण्यात आले.

हा हवामानशास्त्रीय उपग्रह आहे. विशेष म्हणजे हा उपग्रह हवामानाचा अंदाज तसेच आपत्तीचा इशारा देण्यासाठी येणार आहे. इनसॅट- 3डीएस हा उपग्रह तिसऱ्या पिढीतील हवामानाचा अंदाज वर्तवणारा उपग्रह यशस्वीपणे त्याच्या कक्षात ठेवण्यात आला.

इस्रोने आपल्या या नवीन इनसॅट-3 डीएस या उपग्रहाला नॉटी बॉय असे टोपणनाव दिले आहे. हे जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल एफ14 (GSLV F 14) वरून इस्रोने प्रक्षेपित केले आहे. इनसॅट- 3डीएस उपग्रह प्रगत पद्धतीने तयार करण्यात आला आहे. त्याचे काम हवामान अंदाज आणि आपत्तीचा इशारा देणे आहे. हे जमीन आणि समुद्राचे निरीक्षण करण्यासाठी डिझाइन केलेला उपग्रह आहे. इनसॅट- 3डी आणि इनसॅट- 3डीआर या हिंदुस्थानच्या हवामान संस्थांना मोठ्या प्रमाणावर मदत करतील. अचूक हवामानाचा अंदाज देतील. इस्रोने सांगितले की, त्यांच्या 16 व्या मोहिमेदरम्यान, जीएलएसव्ही चे इनसॅट- 3डीएस हवामान उपग्रह जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये तैनात करण्याचे उद्दिष्ट आहे. एसएलव्हीएफ 14 च्या मदतीने इनसॅट- 3डीएस अंतराळात नेण्यात आले.

जीएसएलव्ही (Geosynchronous Satellite Launch Vehicle)- F14 हे रॉकेट आहे. 51.7 मीटर लांबीच्या या रॉकेटचे वजन सुमारे 420 टन आहे. तीन टप्प्यांत त्याचा प्रवास पूर्ण होतो. या रॉकेटच्या मदतीने हा उपग्रह भू- सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये ठेवण्यात आला. दळणवळण, नेव्हिगेशन आणि पृथ्वी संसाधन सर्वेक्षण या उद्देशांसाठी डिझाइन केलेले उपग्रह या कक्षेत स्थापित केले आहेत. इनसॅट- 3डीएस हा तिसऱ्या पिढीचा हवामानशास्त्रीय उपग्रह आहे. हे जिओसिंक्रोनस ऑर्बिटमध्ये ठेवण्यात आले आहे. हे हवामानाचा अंदाज आणि आपत्तीचा इशारा देण्यासाठी डिझाइन केले आहे. ते जमीन आणि समुद्राच्या पृष्ठभागावर लक्ष ठेवेल. हा उपग्रह आधीच कार्यरत असलेल्या इनसॅट- 3डी आणि इनसॅट- 3डीआर उपग्रहांच्या संयोगाने कार्य करेल. यामुळे हवामानाशी संबंधित अधिक चांगली माहिती मिळेल.

Latest Posts

Don't Miss