Latest Posts

जय माता दुर्गा क्रिकेट क्लब गीताली तर्फे आयोजित भव्य रबरी बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटन संपन्न

– माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने आयोजित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / मुलचेरा (Mulchera) : तालुक्यातील शांतिग्राम ग्रामपंचायत अंतर्गत गीताली येथे माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने जय माता दुर्गा क्रिकेट क्लब गीताली यांच्या सौजन्याने भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटक म्हणून खेवले मुख्याध्यापक राजे धर्मराव हायस्कूल लगाम हे होते. त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सह उदघाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते संतोष उरेते हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद समद्दार, संतोष देवनाथ, निखिल सिकदार, सुभाष मंडल, शाम बाईन, रवींद्र मंडल, नरेश मुजुमदार, अरविंद जोहार, असीम बाला, रमेन बैरागी, माणिमान मंडल, तापन दत्ता, मधू मुजुमदार, वैष्णव ठाकूर हे होते.

यावेळी मोठ्या संख्येने स्पर्धकांनी या भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेला हाजरी लावली होती.

या भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार २५ हजार १ रु. व द्वितीय पुरस्कार २० हजार १ रु. हे दोन्ही पुरस्कार माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून देण्यात आले आणि तृतीय पुरस्कार १० हजार १ रु. सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ उरेते यांच्या तर्फ देण्यात आला.

यावेळी मोठ्या उत्साहात स्पर्धा पाहण्यासाठी गीताली येथील गावकरी, युवा वर्ग आणि महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss