Latest Posts

आविसंचे कार्यकर्त्यांसह अनेकांनी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा युवा नेतृत्वावर विश्वास करीत भाजपात केला प्रवेश

– युवा वर्गात राजेंचा प्रचंड लोकप्रियतेने अहेरी विधानसभा क्षेत्रात सातत्याने होत आहेत भाजपा प्रवेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील आदिवासी विद्यार्थी संघटनेचे कट्टर कार्यकर्ते श्रीकांत बंडमवार तथा पेरमिली येथील उपसरपंच सुनील सोयाम यांच्यासह विविध पक्षातील शेकडो युवक व महिलांनी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा युवा नेतृत्वावर विश्वास करीत नुकताच अहेरी येथील रुक्मिणी महालात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपात अधिकृत प्रवेश केला. यावेळी राजेंनी भाजपाचा दुपट्टा टाकून पक्षात त्यांचे स्वागत केले, विविध पक्षांचे कार्यकर्ते भाजपात आल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.

माझ्यावर विश्वास करून तुम्ही भाजपात प्रवेश केला आहे, तुमचा विश्वासघात मी कदापी होहु देणार नाही, तुमचा क्षेत्रांतील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन राजेंनी ह्यावेळी केले, त्याला राजे साहेब आगे बडो.. हम तुम्हारे साथ है अशी जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी राजेंना जोरदार दाद दिली.

राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे शांत व संयमी स्वभाव, प्रत्येकाशी आपुलकीने बोलण्याचा तथा गरजूला मदत करण्याचा गुण, विकासाची दूरदृष्टी ह्यामुळे युवा वर्गात राजेंची प्रचंड लोकप्रियता असून त्यामुळे संपूर्ण अहेरी विधानसभा क्षेत्रातुन राजेंचा युवा नेतृत्वावर विश्वास करीत भारतीय जनता पार्टीत सातत्याने प्रवेश होत आहे तसेच राजेंसाठी सकारात्मक वातावरण आहे.

भाजपात प्रवेश केलेल्यांची नावे : श्रीकांत बंडमवार पेरमिली, सुनिल सोयाम उपसरपंच पेरमिली, वासूदेव हबका शाळा व्यवस्थापन समिती कोयनगुडा भामरागड, रामदास वेलादी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती पेरमिली, ईश्वर गावडे कोयनगूडा, रैनू तिम्मा कोयनगूडा, सूधाकर परसा हितापाडी, सूधाकर आतलामी आलदंडी भामरागड, संतोष कोपर्ती मन्नेराजाराम, राजेश नरोटी कोयनगूडा, अजय उसेंडी पेरमल भट्टी भामरागड, संतोष तिम्मा बिनागूंडा, दिनेश पूंगाठी क्रिष्णार, तपन पाल देशबंधूग्राम, शरद वेलादी चंद्रा, शिवराम पेंन्दाम चंद्रा, दौलत वेलादी चंद्रा, दौलत मडावी चंद्रा, प्रविण मडावी चंद्रा, तेजराव वेलादी चंद्रा, योगेश मडावी चंद्रा, रितेश सडमेक चंद्रा, दिवाकर मडावी मळलेली भामरागड, मंगेश मडावी पिनगूंडा एट्टापली, तेजरा वेलादी चंद्रा, रमेश वेलादी चंद्रा इत्यादी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss