विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : आपण व्यक्ती म्हणून समाजाचे काही देणे लागतो. आपले कुणाकडेही लक्ष नसले, तरी शिक्षित व जबाबदार व्यक्तिमत्त्व म्हणून समाजाचे आपल्याकडे लक्ष असते. आपण व्यक्ती म्हणून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडायला हवी. हीच बाब लक्षात घेऊन सुमित जोशी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व दिवाणी न्यायाधीश (वरीष्ठ स्तर) आपण आपल्या जन्मदिना निमित्त जिला वैद्यकीय महाविद्यालय येथील रक्तकेंद्र विभाग येथे स्वतः उपस्थित राहून रक्तदान केले व सामाजिक जनजागृतीचे संदेश दिले.
रक्तदान हे महा दानाच्या श्रेणीत मोजल्या जाते आणि रक्तदान करून रुग्णाचे प्राण वाचविण्यात सहकार्य होते व नियमित रक्तदान केल्याने शरीर सुद्धा स्वस्थ व सुदृढ राहते. चंद्रपूर येथील रक्तकेंद्र विभागात रुग्णांसाठी नियमितपणे रक्ताची गरज भासत असते व अशा वेळेस आपल्या जन्मदिनी न्यायाधीश यांनी रक्तदान करून सर्वांसमोर आदर्श निर्माण केले आहे. आपल्या जन्मदिनी रक्तदान केल्याबद्दल चंद्रपूर रक्तकेंद्रा तर्फे न्यायधीश यांचे धन्यवाद व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनचे कार्यकारणी सदस्य व रक्त संयोजक ॲड.आशिष मुंधडा, डॉ.अमीत प्रेमचंद – अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक, डाॅ. स्वाती देरकर – वरिष्ठ निवासी डॉक्टर, डॉ.मिलींद झाडे- वरिष्ठ निवासी डॉक्टर, पंकज पवार -समाजसेवा अधीक्षक, अमोल जिद्देवार -रक्तकेंद्र तंत्रज्ञ, स्नेहल शेंडे -इंटर्न, उमेश आडे -समाजसेवा अधीक्षक, सुखदेव चांदेकर -सहाय्यक, ॲड.महेंद्र असरेट, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागातील सोनकुसरे व अन्य अधिकारी उपस्थित होते.