Latest Posts

बस ! मतदान करा आणि जिंका एनफिल्ड बुलेट : सोन्याचे नाणे आणि मोबाईल

– मतदारांसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे आकर्षक बक्षीस योजना.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (chandrapur) : लोकशाही प्रक्रियेमध्ये १८ वर्षांवरील नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे. या अधिकाराचा प्रत्येकाने वापर करून लोकशाहीच्या बळकटीकरणसाठी तसेच देशाचे भविष्य उज्वल करण्यासाठी हातभार लावणे अपेक्षित आहे. जास्तीत जास्त मतदारांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने मतदारांसाठी आकर्षक बक्षीस योजना जाहीर केली आहे. यात एनफिल्ड बुलेट, सोन्याचे नाणे आणि मोबाईल ही बक्षीसे तुम्ही जिंकू शकता, त्याकरीता बस, मतदान करून आपला सेल्फी फोटो अपलोड करायचा आहे.

२० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुकीकरीता मतदान होणार आहे. यात मतदारांनो तुमचे मत द्या आणि लकी ड्रॉमध्ये आकर्षक बक्षिसे जिंकण्याच्या संधीचा फायदा घ्या, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. लकी ड्रॉद्वारे काढण्यात येणाऱ्या पहिल्या क्रमांकाचे बक्षीस आहे २.१५ लाखांची  रॉयल एनफिल्ड बुलेट (प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा आणि विमा खर्च समाविष्ट). सदर बाईक सध्या विसापूर येथील अटलबिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डनमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. इतर बक्षिसांमध्ये १५ ग्राम सोन्याचे नाणे, आणि एस-२३, फाईव्ह जी सॅमसंग गॅलक्सी फोनचा समावेश आाहे.

अशी आहे पात्रता : १) चंद्रपूर जिल्ह्यातील नोंदणीकृत मतदार असणे आवश्यक. २) २० नोव्हेंबर २०२४ रोजी यशस्वीरित्या मतदान करणे आवश्यक.

सहभागी होण्यासाठी : इच्छुक मतदारांनी मतदानाच्या दिवशी सेल्फी घ्यावा आणि तो दिलेल्या Google फॉर्मवर (https://forms.gle/L9hkapkUuR3c46jBA) अपलोड करावा. दिलेला QR कोड देखील त्यात प्रवेश करण्यासाठी स्कॅन केला जाऊ शकतो.

Latest Posts

Don't Miss