Latest Posts

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ. इंदुराणी जाखर 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / कल्याण (Kalyan) : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासह दोन अन्य सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. डॉ. दांगडे यांची बदली आता महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर करण्यात आली आहे. तर २०१६ बॅचच्या आयएएस अधिकारी आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. इंदुराणी जाखर यांची बदली आता कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आयुक्त पदावर करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. जाखर या आता कल्याण-डोंबिवली पालिकेच्या आयुक्त म्हणून काम पाहतील.

रायगड जिल्हा जातपडताळणी समितीचे अध्यक्ष श्रीधर दुबे यांची बदली करण्यात आली असून ते आता महाराष्ट्र राज्य सहकारी खरेदी-विक्री महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

Latest Posts

Don't Miss