Latest Posts

कसनसुर येथे भव्य जनजागरण मेळावा व क्रीडा स्पर्धा संपन्न 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी (Chamorshi) : ०८ नोव्हेंबर २०२३ आणि ७ नोव्हेंबर २०२३ रोजी उप पोलीस स्टेशन कसनसुर येथे भव्य जनजागरण मेळावा आणि वीर बाबुराव शेडमाके क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आले.

सर्वप्रथम भगवान बिरसा  मुंडा व वीर बाबुराव शेडमाके ह्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जनजागरण मेळाव्याला सर्वात करण्यात आली प्रभारी अधिकारी धिरसिंग वसावे यांनी उपस्थित नागरीकांना शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले जनजागरण मेळावा संपल्यानंतर व्हॉलीबॉल स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सीआरपीएफ १९२ बटालियनचे असिस्टंट कमांडंट अतुल यांच्या हस्ते करण्यात आले.

ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणाऱ्या योजनाची माहिती परी. पो.उ. बोरसे यांनी दिली तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन परी पो. उनि रोहित जाधव यांनी  केले.

जनजागरण मेळाव्यात कसनसुर हद्दीतील नागरीकांना खालील प्रमाणे लाभ देण्यात आला.
० ते ०५ वयोगटातील बालकांचे आधार कार्ड काढून देण्यात आले  –
१) P.M. kisan yojana KYC new ragistration- ०८, २) PAN कार्ड -०६, ३) आभा कार्ड – १६, ४) इश्रम card -१९, ५) नवीन वीज जोळणी-०१, ६) वीज भरणा -०३, ७) शेततळे प्रस्ताव -०२, ८) विहीर प्रस्ताव -०२, ९) उत्पन्न दाखले -०४, १०) पंतप्रधान उज्वला योजना – ०८.

सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येत उपस्थित राहिलेल्या महिलांना साडी वाटप करण्यात आली. तसेच वयस्कर पुरुषांना थंडी पासून बचाव करणारे ब्लँकेटचे  वाटप करण्यात आले. उपस्थित स्पर्धक व जनजागरण मेळाव्याला जमलेल्या लोकांना कार्यक्रम संपल्यानंतर जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

जनजागरण मेळावा संपल्यानंतर व्हॉलीबॉल स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सीआरपीएफ १९२ बटालियनचे असिस्टंट कमांडंट अतुल यांच्या हस्ते करण्यात आले. व्हॉलीबॉल स्पर्धे करीता एकूण १२ संघांनी सहभाग घेतला त्यातून प्रथम क्रमांकाचे विजेतेपद मौजा घोटसुर द्वितीय क्रमांक भूमकाम तृतीय क्रमांक जवेलीयांनी पटकविले.

तसेच कबड्डी स्पर्धेकरीता एकूण ८ संघांनी सहभाग नोंदविला असता प्रथक पारितोषिक मौजा कसनसुर च्या संघाने पटकावले द्वितीय क्रमांक कोताकोंडा, तृतीय क्रमांक वेणासार कार्यक्रमास उप पोलीस स्टेशन कसनसुर चे प्रभारी अधिकारी PSI वसावे, परी.पो. उनि बोरसे, जाधव, एस.आर.पी. एफ ग्रुप क्र. १६ चे कंपनी  PSI साळुंखे. सीआरपीएफ AC अतुल साहेब, पीआय मीना आणि जिल्हा पोलीस तसेच एसआरपीएफ चे अमलदार उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss