Latest Posts

कसनसूर येथे औषधालयाला लागली आग : माहिती मिळताच माजी जि.प. अजय कंकडालवार घटनास्थळी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली (Etapalli) : तालुक्यातील कसनसुर या गावी ९ जानेवारीला एकदम पहाटे च युगेश्वरी सुनील तेलकुंठवार यांच्या मालकीचे चंद्रखंडी मेडिकलला आग लागण्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. आणि पहाटेच आलेल्य फोनला प्रतिसाद देत आविसं- काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती अहेरी अजय कंकडालवार हे घटनास्थळी पोहचले.

घटनास्थळी पोहताच त्यांनी घटनेच्या विषयी जाणून घेऊन त्यांनी पंचनामा करण्यासाठी अधिकारी वर्गाला फोन करून बोलवले आणि त्यावेळी होऊ शकते ती मदत त्यांनी सहकारी सदस्यांनी केली. या घटनेत मेडिकलचे सर्वच साहित्य जळून खाक झाले. त्यात महत्वाचे कागदपत्रे पण आगीत भस्म झाले. त्यात काम करणारा सहाय्यक औषध विक्रेता आकाश गड्डमवार हा गंभीर रित्या जखमी झाला.

त्याला पुढील उपचाराकरिता चंद्रपूर ला पाठविण्यात आले. झालेल्या घटनेने तेलकूंठवार परिवार व गावकरी वर्गाने हळहळ व्यक्त केली. त्याच्यात झालेल्या लाखो रुपयाचे नुकसानाबद्दल शासनातर्फे मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असून झालेल्या घटनेबद्दल आपण तेलकुंठवार परिवार सोबत असल्याचे ते बोलले.

यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू मडावी, संगीता उसेंडी, जयेंद्र पवार, जग्गू देवरी, रमेश दुग्गा, सुधाकर टेकाम, अंकरम नरोटे, मनोहर पाटील, स्वप्नील मडावी, कार्तिक तोगम माजी उ.प. सरपंच मरपल्ली, नामदेव हीचमी नगर सेवक नगरपंचायत एटापल्ली, प्रज्वल नागुलवार आ.वी.स. सचिव एटापल्ली, मनीष दुर्गे, तालुका प्रमुख, प्रशांत टेकुलवार सचिव आविका स्वप्नील कन्नमवार, आवीका हालेवरा, सुधाकर गोटा वणहरा अध्यक्ष ग्रामसभा, लालसू नरोटे सरपंच, बाडू आत्राम सरपंच गुरुपल्ली, सैनू मट्टामी पाटील, सुरेश मट्टामी, अभिजित दासरवार, संतू नरोटे उपसरपंच, निलेश वेलादी सरपंच मेडपल्ली, दिवाकर ईप्पावारसह आदी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss