विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : गणेशोत्सवानिमित्य अनंत चतुर्दशीच्या पर्वावर नवेगांव पेठ चिमूर येथील ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे यांच्या निवासस्थानी महाप्रसाद कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.
यावेळी तेथील विराजमान श्री गणेशाचे भक्तिभावाने दर्शन घेतले व त्यांच्या कुटुंबियांशी हितगुज साधून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी अनूसया मातेच्या अनुयायी मा सोनामाताचे दर्शन घेऊन नतमस्तक होत खासदार अशोक नेते व आमदार बंटी ऊर्फ कीर्तीकुमार भांगडिया यांनी आशीर्वाद घेतले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंमपल्लीवार, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्रीरंग (बालू) पिसे, भाजपा ज्येष्ठ भाजपा ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष एकनाथ थुटे, उपाध्यक्ष भारत खटी, भाजपा नेते योगेश नाकाडे, भाजयुमो तालुका उपाध्यक्ष भाजयुमो तालुका महामंत्री रोशन बन्सोड, राकेश देवतळे, प्रणय देवतळे व अन्य मान्यवर उपस्थित होते.