Latest Posts

खा. अशोक नेते यांच्या प्रयत्नाने सावली तालुक्यातील मंजुर झालेल्या जनसुविधेअंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न 

– खा. अशोक नेते यांच्या हस्ते व्याहाड बुज‌, सामदा, सोनापुर व घोडेवाही या ठिकाणी कुदळ मारून कामाच्या भूमिपूजनाचा शुभारंभ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सावली (Savli) : गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खा. अशोक नेते यांच्या विशेष प्रयत्नातुन जनसुविधा अंतर्गत २.६० दोन कोटी साठ लक्ष रूपये) सावली तालुक्यातील सामदा बूज, सोनापुर, व्याहाड बूज, घोडेवाही येथील जनसुविधा अंतर्गत मंजूर कामाचे भूमिपूजन खा. अशोक नेते यांच्या शुभहस्ते कुदळ मारून कामाच्या भूमिपूजनाचे उद्घाटन सोहळा पार पडला.

यावेळी ग्रामपंचायत सामदा बुज, व्याहाड बुज व कोंडेखल येथे खा. अशोक नेते यांचे पुष्पगुच्छ देऊन ग्रामपंचायत कमिटीने स्वागत केले. याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी गावांतील समस्या, प्रश्न, पिण्याच्या पाण्याचे समस्या, शेतकऱ्यांचे विषय जाणुन घेत,शेतकऱ्यांन विषयी संवेदनशील विचार व्यक्त करत नहराच्या पाईपलाईन संबंधित तात्काळ सिंचाई विभागाचे अधिकारी व गोसीखुर्द अधिकारी यांच्या समेत बैठक घेण्या संबंधित सुचना केल्या व लवकरात लवकर या संबंधि बैठक आयोजित केली जाईल. सदर बैठकिला सिंचाई विभागाचे अधिकारी, तहसीलदार, बिडिओ, गोसीखुर्द अधिकारी, कृषि विभाग अधिकारी, ग्रामिण रुग्णालय अधिकारी, विद्युत महावितरण अधिकारी बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देशित सुचना केल्या.

यावेळी खासदार तधा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते, तालुकाध्यक्ष अविनाश पाल, सावलीचे बिडीओ वासनिक साहेब, नायब तहसीलदार मंथनवार, सहाय्यक बिडिओ तेलकापलीवार, विस्तार अधिकारी देवतळे, कृषि अधिकारी अश्विनी घोडसे, कृ. उ.बा. समिती संचालक तथा भाजपा युवा नेते सचिन तंगडपल्लीवार, जेष्ठ नेते अरुण पाल, माजी उपसभापती रविंद्र बोल्लीवार, भाजपाचे युवा सामाजिक नेते किशोर वाकुडकर, सामदा चे सरपंच शुभांगी मडावी, माजी सरपंच देवानंद पाल, व्याहाड बुज सरपंच्या कविता बोलीवार, सोनापुरचे सरपंच्या जयश्री मडावी, उपसरपंच परशुराम भोयर, उपसरपंच मुकेश भुरसे, उपसरपंच नरेश बाबणवाडे, उपसरपंच चेतन रामटेके, ग्रा.प. सदस्य तथा खासदार यांचे सहाय्यक दिवाकर गेडाम, सदस्या प्रणिता तोडेवार, ग्रा.प. सदस्य प्रकाश नागापुरे, सदस्य शरद मडावी, सदस्या उषा पोहनणकर, सुखदेव मोहुरले, सदस्य विशाल वाढणकर, अनुराग लेनगुरे, प्रविण पोहणकर, अमोल पिपरे, कुकडे महाराज, प्रशांत मडावी, डॉ. तोडेवार, दासरवार, ग्रामसेवक बांगडे, तुळशीदास भुरसे, सुधाकर म्याकलवार, राजु गेडाम, कानू गेडाम, महादेव वाढई, साईनाथ संदोकर, देवराव गोहणे तसेच कार्यकर्ते व मोठ्या संख्येने गावकरी नागरिक उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss