विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : चंद्रपूर शहरातील गंज वॉर्ड येथील भाजी मार्केट मध्ये दोन मुलीने अंकल म्हणत धक्का देत खिशातून मोबाईल लंपास केल्याची घटना उघडकीस आली.
बल्लारपूरच्या सरदार पटेल वॉर्ड येथील श्रीनिवास ओदेलू चेरकूतोटावर (५४) हे २१ सप्टेंबर ला कार्यालयीन कामानिमित्त चंद्रपूर ला होते. काम झाल्यावर ते गंज वॉर्ड येथील भाजी मार्केट मध्ये भाजीपाला घेण्याकरिता गेले होते. ते आपला ॲपल कंपनी आयफोन मोबाईल किंमत ७० हजार रुपये शर्टच्या वरच्या खिशात ठेवले होते. भाजीपाला घेतल्यानंतर आपल्या वाहन कडे येत असताना दोन मुलींनी अंकल म्हणत धक्का देत त्यांचा मोबाईल लंपास केले.
थोड समोर गेल्यावर त्यांना मोबाईल चोरल्याचे लक्ष्यात आले. त्यांनी दुसऱ्या मोबाईल ने कॉल केले असता मोबाईल नॉट रीचेबल सांगत होते. तसेच त्या मुलींना शोधले असता ते दिसले.
या वरून त्यांनी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेले असता त्यांची तक्रार पोलीस घेण्यास टाळाटाळ करत होते. अखेर २३ सप्टेंबर ला पोलीसांनी तक्रार दाखल केले असून बीएनएस २०२३ कलम ३०३ (२), ३ (५) अन्वये गुन्हा नोंद केले.