Latest Posts

अहेरीचा राजा या मानाचा गणरायाचे जल्लोषात विसर्जन

– गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या या गजरात अहेरी राजपरिवाराचा गणरायाला निरोप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : अहेरी येथील प्रसिद्ध असलेले अहेरी राजपरिवाराचे अहेरीचा राजा या मानाचा गणरायाचे गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या राजमहालाचा भव्य पटांगणातून मोठ्या श्रध्देने प्रचंड आतिषबाजी, प्रसिद्ध धामणगावचे ढोल ताशे, नागपूर डिजे, छत्तीसगढ आदिवासी नृत्य, विविध प्रकारच्या वाद्यांच्या तालावर नाचत गाजत अहेरीचा राजाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

अहेरी राजनगरीत श्री गणरायाचे १९ सप्टेंबरला विधिवत आगमन झाले. गणेश उत्सवाचे दहा दिवस मोठ्या उत्साहाने आनंदाने संपूर्ण तयारी राजनगरी साजरा केले. या दहा दिवसात माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वात विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकल नृत्य, सामूहिक नृत्य, महिला भजन संध्या, पुरुष भजन संध्या, सुगम संगीत अशा विविध कार्यक्रमात संपूर्ण दहा दिवस साजरा करण्यात आले. स्पर्धेमध्ये येणाऱ्या प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विशेष आकर्षक अशी स्मृतिचिन्ह व भेटवस्तू रोज स्पर्धकांना देण्यात आले.

रोजच्या स्पर्धेकरिता संपूर्ण राजनगरीतील तरुण युवती महिला व प्रतिष्ठित नागरिक तसेच गावकरी मोठ्या उत्सवाने आपलया उपस्थिती ने कार्यक्रमाची शोभा वाढवली. अहेरीचे राजा गणेश मंडळाच्या रोज विधिवत पूजा अर्चना तथा महारथी करण्यात आले.

रोज कैरीचा राजा श्री गणेशाला सायंकाळी राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते महाआरती करण्यात येत होते. त्याकरिता होणाऱ्या महाआरती करिता राजनगरीतील संपूर्ण गणेश भक्तांची मोठ्या संख्येने गर्दी असायचे महाआरतीनंतर लगेच प्रसाद वाटप तथा आरती संग्रह पुस्तिका उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना राजे यांच्या हस्ते देण्यात आले.

महाआरती करिता अहेरी राजनगरीतील भाविक तसेच अहेरीलगत असलेले तेलंगाना राज्यातील भाविक तसेच अहेरी, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, सिरोंचा या पाच तालुक्यातून गणेश भक्तांची मांदियाळी बघायला मिळाले.

Latest Posts

Don't Miss