Latest Posts

कोताकोंडा येथे एकाच मैदानात कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

– माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते उदघाटन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली (Etapalli) : तालुक्यातील कोत्ताकोंडा (बु.) येथे कोंडागड क्लब तर्फे भव्य ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उदघाटन माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी सहउदघाटक म्हणून गाव पाटील लक्ष्मण इष्टाम, स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून गंगाराम इष्टाम, उपाध्यक्ष लालू उसेंडी, राकॉचे एटापल्ली तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार, माजी जि.प. सदस्य ज्ञानकुमारी कौशी, विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, सरपंच साधू कोरामी, भूमिया लालसू इष्टाम, घोटसुर चे माजी सरपंच शिवाजी हेडो, हालेवाराचे माजी सरपंच गणूजी मट्टामी, नगरसेवक जितेंद्र टिकले, जारावंडीचे सरपंच सपना कोडापे, येमलीचे सरपंच ललिता मडावी, नगरसेविका निर्मला हिचामी, सरिता हिचामी, माजी नगरसेवक सगुणा हिचामी, चिंता गोटा, रामचंद्र चौधरी, हरिदास मोहूर्ले आदी उपस्थित होते.

कोत्ताकोंडा (बु.) गावात पहिल्यांदाच भव्य ग्रामीण कबड्डी व व्हॅलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पारितोषिक आणि आकर्षक शिल्ड देण्यात आले. गावात पहिल्यांदाच क्रीडा स्पर्धेचे आयोजन झाल्याने परिसरातील विविध गावातील चमुंनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे.

२३ फेब्रुवारी रोजी या भव्य ग्रामीण कबड्डी व व्हॅलीबॉल स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी गावात आगमन होताच गावकऱ्यांनी ढोल ताश्यांच्या गजरात आणि विद्यार्थ्यांनी लेझीम द्वारे मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी परिसरातील कबड्डी व व्हॉलीबॉल प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss