Latest Posts

कुनो अभयारण्यात वाघाची पावले : वाघ-चित्ता संघर्ष होणार ? वनविभागात खळबळ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले आहे. त्याच वेळी, कुनो (Kuno sanctuary) नदीलालगत रणथंबोर राष्ट्रीय व्याघ्र उद्यानाची सीमा देखील आहे.
अशा परिस्थितीत काही वेळा रणथंबोरमधले वाघही कुनो अभयारण्यात दिसू लागल्याने वन विभागात (forest department) खळबळ उडाली आहे.

कुनो (kuno) अभयारण्याचे वनअधिकारी थिरुकुरल आर म्हणाले की, कुनोमध्ये वाघ असल्याच्या बातम्या वास्तव असू शकतात. कारण नुकतेच येथे वाघाच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. त्याचवेळी वाघांपासून कोणताही धोका नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कारण पावलांचे ठसे सापडल्याचे ठिकाण चित्त्यांच्या मोठ्या आवारापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगितले जाते. मात्र, वाघाचा फिरण्याचा परीघ हा १४ चौकिमी असल्याने भविष्यात वाघ़ आणि चित्ता यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार येथे वाघांची ये-जा सुरूच असते. अशा परिस्थितीत कुनो मधील चित्त्यांना एका मोठ्या बंदिस्तात ठेवण्यात आले असून ते पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र याचा फटका पर्यटकांना सहन करावा लागत आहे. कारण पर्यटकांना चित्त्याच्या गुहेजवळही येता येत नाही आणि त्यांना बाजुलाही जाऊ दिले जात नाही.

कुनो नॅशनल पार्कमधील खुल्या जंगलात फिरणाऱ्या सर्व चित्त्यांमध्ये सहा नर आणि पाच मादींचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना शांत करण्यात आले असून त्यांना मोठ्या बंदोबस्तात हलवण्यात आले आहे, तर चार चित्ते अजूनही खुल्या जंगलात आहेत.

Latest Posts

Don't Miss