Latest Posts

बिबट्याने गोठ्यात घुसून गायीच्या वासराला केले फस्त 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballapur) : वेकोलिचे कर्मचारी व कामगार नेते श्याम खेंगर यांच्या फार्महाऊस मध्ये मॉन्टफोर्ट आयटीआय, बल्लारपूर समोर व संत चवरा हॉस्पिटलच्या आवारात खुंटीला बांधलेल्या गायीच्या वासराला बिबट्याने खाऊन टाकल्याची घटना घडली आहे. आज पहाटे घडलेल्या या घटनेची वनविभागाकडे तक्रार केल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व कोणत्या वन्य प्राण्याने वासराला खाले हे शोधण्यासाठी ट्रॅप कॅमेरा बसवण्यात आला.

या घटनेत बिबट्याने गीर जातीच्या गायीच्या वासराला ठार केल्याने गाईच्या मालकाचे आर्थिक नुकसान झाले आहे. इतक्या दिवसात पहिल्यांदाच गोठ्यात घुसून गायीची शिकार केल्याची घटना समोर आली आहे, मात्र आता हा बिबट्या येणार असल्याने गायीचे मालक श्याम खेंगर यांना इतर गायींच्या सुरक्षेची चिंता सतावत आहे.

वनविभागाचे अधिकारी नरेश भोवरे यांनी सांगितले की, बिबट्यापासून गायींचे संरक्षण करण्यासाठी आवारात रात्रीची गस्त वाढवली जाईल. वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे व त्यांचे पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Latest Posts

Don't Miss