Latest Posts

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार : नागभीड तालुक्यातील घटना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागभीड (चंद्रपूर) : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार झाल्याची घटना रविवारी रात्री ७:४५ वाजताच्या दरम्यान कानपा गावाजवळ घडली. नागभीड तालुक्यातील कानपा परिसर जंगलव्याप्त आहे. याच परिसरातून नागभीड- उमरेड हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे.

या परिसरात वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर आहेत. या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते.
रविवारी ७:४५ वाजताच्या सुमारास रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असताना हा बिबट महामार्गावर आला. याचवेळी अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या अन्य प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी वनविभागाला माहिती दिली.

त्यानंतर वनपाल नेरलवार यांच्यासह त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहाेचले. दरम्यान, काही वेळातच अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.वृत्त लिहीत असताना वन अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा सुरू केला.

Latest Posts

Don't Miss