विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : जुन्या वादावरून शरीरावर चाकूने वार करून व गळा चिरून हत्या करणारे आरोपींना मा. न्यायधीस सत्र न्यायालय चंद्रपूर यांनी तीन आरोपींना आजीवन कारावास ची शिक्षा ठोकली.
पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे फिर्याद दाखल करण्यात आली की, प्रकरणातील आरोपीतांनी फिर्यादीचे घरी येवुन फिर्यादीस शिवीगाळ केली व यातील मृतकला जिवाने मारण्याची धमकी दिली. व २६ ऑक्टोबर २०१९ चे २ वाजताच्या दरम्यान यातील आरोपीतांनी मृतक अक्षय उर्फ प्रेम बलवंत मुन (१९) यास जुन्या वादावरून परत भांडण करून मृतकाचे शरीरावर चाकुने वार करून व गळा कापुन खुन केला. अश्या फिर्यादीचे तक्रारी वरून पोस्टे चंद्रपूर शहर येथे गुन्हा नोंद केला.
सदर गुन्हयाचा तपास अनुज तारे सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधीकारी मुल यांनी केला असुन प्रकरणातील आरोपीलां विरूद्ध सबळ साक्षपुरावा गोळा करून गुन्हयाचा योग्य तपास करून आरोपी विरुध्द दोषरोपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. सदर खटला मा. डी.जे.३ कोर्ट विद्यमान पी. जी. भोसले सत्र न्यायालय चंद्रपूर यांचे कोर्टात आरोपी विरूध्द सबळ साक्षपुरावे नोंदविण्यात आले.
२१ मार्च २०२४ रोजी आरोपी साजन उर्फ बोंदया रंजीत डोंगरे (१९) राजन उर्फ गुलशन रंजीत डोंगरे (२१) शेख जमीर शेख जलील कुरेशी (३१) तिन्ही आरोपीतास कलम ३०२,३४ भादवी अन्वये आजीवन सश्रम कारावास व ५ हजार रू. दंड, दंड न भरल्यास प्रत्येकी १ महीना अतिरिक्त कारावास शिक्षा देण्यात आली.
सदर गुन्हयात सरकारतर्फे सहा. सरकारी अभियोक्ता आसिफ शेख तसेच कोर्ट पैरवी अधीकारी म्हणुन पोहवा संतोश पवार ब.न.७८३ पोस्टे चंद्रपुर शहर यांनी मोलाची कामगीरी बजावली.