विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षा संस्थान द्वारे केंद्रपुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याद्यान चाचणी परीक्षा आज रविवार १७ मार्च रोजी घेण्यात येत असून बल्लारपूर तालुक्यातील १५ वर्षांवरील ६४५ नवसाक्षर ही परीक्षा देणार असून ५४ परीक्षा केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.
सदर परीक्षा बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेच्या धर्तीवर असून परीक्षेत उत्तीर्ण ठरलेल्या नवसक्षाराला उल्लास ॲपमध्ये ऑनलाईन नोंद करून पात्रता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने २०३७ पर्यंत भारत साक्षर करण्याचा उद्दिष्ट ठेवून राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था द्वारा केंद्र पुरस्कृत उल्हास साक्षरता अभियान मागील चार महिन्यापासून राबविण्यात येत आहे. यासाठी १४६ प्रशिक्षित स्वयंसेवकांची निवड करून त्यांच्याद्वारे प्रत्यक्ष निरक्षर व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांना पायाभूत साक्षर करण्यासाठी संख्याज्ञान, लिहिणे वाचणे शिकविण्यात आले व त्याअनुषंगाने त्यांच्या जवळपास ११ सराव परीक्षा घेण्यात आले होते व आता बोर्ड परीक्षेच्या धर्तीवर परीक्षा घेवून त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ज्या शाळेतून नोंदणी करण्यात आली आहे, ती शाळा परीक्षा केंद्र आहे. दरम्यान परीक्षेसाठी कर्मचारीची नेमणूक केली जाणार असून गोपनीयतेचा भंग करणाऱ्या अथवा कामकूचा टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर त्यांच्या सेवेशी संबंधित सेवाशर्ती नियमानुसार कारवाई केली जाणार आहे अशी माहिती गट शिक्षणाधिकारी पं.स. बल्लारपूर शरद बोरीकर यांनी दिली आहे.
ओळखपत्र असणे गरजेचे असून परीक्षेला येताना फोटो, मतदानकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक यापैकी कोणती एक ओळखपत्र सोबत आणणे गरजेचे आहे. परीक्षानंतर ऑनलाईन नोंदणी केली जाणार असून उत्तीर्ण होणाऱ्या प्रौढांना केंद्र सरकार तर्फे साक्षरतेचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रिकाही दिली जाणार आहे.उल्हास ॲप मध्ये ज्या शाळेतून नोंदणी करण्यात आलेली आहे. त्या परीक्षा केंद्रावर १७ मार्च २०२४ ला सकाळी दहा ते सायं. पाच वाजेच्या कालावधीत परीक्षा घेण्यात येत असून सदर परीक्षेसाठी नवसाक्षरांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे असे शरद बोरीकर, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बल्लारपूर यांनी सांगितले आहे.