Latest Posts

लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन सुरजागड लोह खनिज खाण तर्फे इत्तुलनार येथे बालदिन साजरा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली (Etapalli) : लॉयड्स इन्फिनीट फाउंडेशन सुरजागड लोह खनिज खाण तर्फे मौजा इत्तुलनार येथे बालदिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय जेट्टी (गाव पाटील), प्रतिष्ठित व्यक्ति मेस्सो जेट्टी, दिनेश जेट्टी व गावातील गावकरी, पालक तसेच लॉयड्स इन्फिनीट फाउंडेशन सुरजागड लोह खनिज खाणचे अधिकारी उपस्थित होते.

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू लहान मुलांमध्ये रमायचे आणि त्यांच्या लाघवी स्वभावामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटायचे. २७ मे १९६४ ला पंडितजींचे निधन झाले. चिमुरड्यांच्या लाडक्या चाचा नेहरूंना आदरांजली म्हणून त्यांच्या जन्मदिनी अर्थात १४ नोव्हेंबरला भारतात बाल दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणून दर वर्षी १४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्‍मदिवस बाल दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. केवळ भारतातमध्ये बालदिन १४ नोव्हेंबरला साजरा केला जातो.

Latest Posts

Don't Miss