Latest Posts

लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन तर्फे एकरा खुर्द येथे धरती आबा क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

– जयंती निमित्य ठेवण्यात आले पुरुष व बालकांसाठी नेमबाजी व महिलांसाठी लिंबु-चम्मचेचा स्पर्धा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली (Etapalli) : लॉयड्स इन्फिनीट फाउंडेशन सुरजागड लोह खनिज खाण तर्फे मौजा एकरा खुर्द येथे धरती आबा क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा जयंती साजरा करण्यात आली.

इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात आदिवासींना संघटित करून स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण योगदान भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेय. म्हणून हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. दरम्यान त्यांच्या ऐतिहासिक व स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाला उपस्थित मान्यवरांनी उजाळा दिला.

जयंती निमित्य पुरुष व बालकांसाठी नेमबाजी व महिलांसाठी लिंबु-चम्मचेची स्पर्धा ठेवण्यात आले होते. पुरुषांच्या नेमबाजी स्पर्धेत प्रथम पांडु पुंगाटी, द्वितीय अशोक हिचामी व तृतीय कोमटी हिचामी, महिलांच्या लिंबु-चम्मच स्पर्धेत प्रथम मंगरी गोटा, द्वितीय सलोखा पोद्दार व तृतीय रोशनी गोटा, तसेच बालकांसाठीच्या नेमबाजी स्पर्धेत प्रथम सुनील मट्टामी, द्वितीय रामदास पुंगाटी व तृतीय प्रेम गोटा यांनी बाजी मारली व सदर विजेत्यांना बक्षीसे मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

सदर कार्यक्रमात अध्यक्ष चुकलु गोटा (गाव पाटील), प्रमुख पाहुणे बाजीराव गोटा (पोलीस पाटील), प्रतिष्ठित व्यक्ति रामा गोटा, कोको मडावी, दलसु गोटा व गावातील गावकरी, महिला तसेच लॉयड्स इन्फिनीट फाउंडेशन सुरजागड लोह खनिज खाणचे अधिकारी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss