Latest Posts

लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन तर्फे मोद्दीमोडगु (आलापल्ली) टी.एल.एस. कॅम्प येथे जागतिक एड्स दिवस साजरा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : लॉयड्स इन्फिनीट फाउंडेशन तर्फे मौजा मोद्दीमोडगु (आलापल्ली) टी.एल.एस. कॅम्प येथे जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक डॉ. चंदेर (लॉयड्स हाॅस्पीटल हेडरी), साहु (फार्मसिस्ट), प्रशांत पांडा,

सुरेश एम.) व टि.एल.एस. ड्रायव्हर, कर्मचारी तसेच लॉयड्स इन्फिनीट फाउंडेशनचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक डॉ. चंदेर (लॉयड्स हाॅस्पीटल हेडरी), साहु (फार्मसिस्ट) यांनी एड्स कश्यामुळे होते त्याचा आपल्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसेच त्यापासून कसे बचाव करता येईल याबाबत जनजागृती केली.

एचआयव्ही हा एक गंभीर आजार आहे. जो एका प्रकारच्या प्राणघातक संसर्गामुळे होतो. एड्सचे पूर्ण नाव अक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम (acquired immune deficiency syndrome) आहे. हा एक प्रकारचा विषाणू आहे, ज्याचे नाव एचआयव्ही (ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस/Human immunodeficiency virus) आहे. या आजारात संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवर हा व्हायरस हल्ला करतो. त्यामुळे शरीर सामान्य आजारांशीही लढण्यास असमर्थ ठरते.

याकरिता एचआयव्ही संसर्गाबाबत जगभरातील लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (Human immunodeficiency viruses : HIV) च्या संसर्गामुळे होणारा साथीचा रोग एड्स (AIDS) म्हणून ओळखला जातो.

Latest Posts

Don't Miss