Latest Posts

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ च्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दल सज्ज

– अतिसंवेदनशिल मतदान केंद्रासह सर्वत्र राहणार नजर
– १५ हजार सुरक्षा जवानांच्या सुरक्षिततेत पार पडणार संपूर्ण निवडणूक प्रक्रिया
– १५८ आत्मसमर्पित माओवादी देखिल बजावणार आपला मतदानाचा हक्क
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १२- गडचिरोली- चिमुर लोकसभा मतदार संघाकरीता १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त असल्याने माओवादी हे सुरक्षा दलाच्या जवानांवर प्राणघातक हल्ला करणे, स्फोट घडवून आणणे, सरकारी मालमतेचे नुकसान करणे इ. देशविघातक कृत्य करीत असतात. या निवडणूकीच्या अनुषंगाने सदर मतदान प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाहण्यासाठी गडचिरोली पोलीस दल पूर्ण तयारीनिशी सज्ज आहे.

ही निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बी.एस.एफ., सी.आर.पी.एफ., सी.आय.एस.एफ., एपीएसपी, एस.आर.पी.एफच्या ४० कंपणी तसेच मुंबई रेल्वे पोलीस, नागपूर रेल्वे पोलीस, पिंपरी चिंचवड, पुणे शहर पोलीस, छत्रपती संभाजीनगर रेल्वे पोलीस, नवी मुंबई पोलीस, पुणे रेल्वे पोलीस असा विविध ठिकाणाहून एकुण १५०० च्या वर तसेच छत्रपती मंभाजीनगर, जळगाव व इतर विकाणाहून १७५० च्या वर गृह रक्षक दलाच्या सुरक्षा जवानांमह एकूण १५ हजार च्या वर सुरक्षा जवानांचा फौजफाटा जिल्ह्यातील संपूर्ण मतदान केंद्रावर तैनात करण्यात आलेला आहे. निवडणूक चंदोबस्ताकरिता तैनात संपूर्ण सुरक्षा जवानांना निवडणूकीच्या अनुषंगाने उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. यासोबतच जिल्ह्यातील ३६१ अतिसंवेदनशिल मतदान केंद्रावर केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तैनात करण्यात आलेले असून सी-६०/ क्यू.ए.टी./ वि.कृ.द./ क्यु.आर.टी पथकाच्या ३६ तुकड्यामार्फत जिल्ह्यातील अतिसंवेदनशिल जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबविण्यात येणार आहे.

यासोचतच जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर आकाशमार्गाने देखिल सूक्ष्म पाहणी करण्यासाठी अत्याधूनिक १३० ड्रोनसह ड्रोन टीम तसेच माओवाद्यांच्या ड्रोनचर प्रतिहल्ला करण्यासाठी ०५ अँटी ड्रोन गन देखिल सज्ज राहतील. निवडणूक काळात मतदान केंद्रापर्यंत जाण्या-येण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या मार्गावर डी.एस.एम.डी./ व्हेईकल माउंटेड डी.एस.एम.डी चा उपयोग करुन सुमारे ७५० कि.मी. रोड ओपनिंग अभियान राबविण्यात येणार आहे. यासोबतच भारतीय वायुसेनेचे ०३ एम.आय. १७ व २ ए.एल.एच आणि भारतीय लष्कराचे ०२ ए.एल.एच असे एकुण ०७ हेलीकॉप्टर हे गडचिरोली पोलीस दलाच्या मदतीला तैनातीस असून गडचिरोली पोलीस दलाच्या ०२ हेलीकॉप्टरसह एकूण ०९ हेलीकॉप्टरच्या सहाय्याने गडचिरोलीतील विविध संवेदनशिल व अतिसंवेदनशिल ठिकाणी मतदान कर्मचाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील आंतरराज्य सिमेवरील राज्यांमार्फत देखिल निवडणूकीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर माओवाद विरोधी अभियान राबविण्यात येणार आहे.

यासोचतच १६ एप्रिल २०२४ (पी-३) रोजी सकाळपासून भारतीय वायुसेनेच्या एम.आप १७ आणि भारतीय लष्कराच्या ए.एल.एच. हेलीकॉप्टरच्या मदतीने ६१-अहेरी विधानसभा मतदार संघातील ६८ मतदान केंद्रावरील २९५ मतदान कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पाठविण्याची प्रक्रिया सुरु आहे. निवडणूक काळात पोलीस दल हे निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात प यशस्वीपणे पार पाडण्याकरिता चंदोबस्तात तैनातीस असल्याने त्यांना स्वतःचे मतदान करता येत नव्हते. याचा सारासार विचार करुन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फतीने गडचिरोली पोलीस दलासाठी १३ एप्रिल ते १५ एप्रिल २०२४ असे तीन दिवस आरमोरी, अहेरी व गडचिरोली याठिकाणी टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याने गडचिरोली पोलीसांमार्फत एकुण ६१५ टपाली मतदान करण्यात आले आहे. यासोबतच १५८ आत्मसमर्पित माओवादी हे लोकसभा सार्वात्रिक निवडणूक- २०२४ करिता मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ च्या अनुषंगाने निवडणूक ही शांततापूर्ण वातावरणात निविघ्नपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, विविध राज्यातील पोलीस दल तसेच राज्यातील विविध विभागातील पोलीस दल, गृह रक्षक दल हे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज आहेत. यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील नागरिकांना भयमुक्त वातावरणामध्ये पुढे येऊन सर्वांनी मतदा करण्याचे आवाहन केले आहे.

Latest Posts

Don't Miss