Latest Posts

प्रभु श्रीराम चे अयोध्या मधून आणलेले कलश साई मंदिरात

– साई मंदिरातून कलश दिंडी यात्रा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : श्रीराम प्रभू चे भव्य कलश शोभायात्रेचे मिरवणूक १ जानेवारी २४ रोजी नवीन वर्षाला श्रीराम प्रभूची कलश यात्रा श्री साईबाबा मंदिर बालाजी वार्ड बल्लारपूर येथून कलस दिंडीची मिरवणूक दुपारी बारा वाजता काढण्यात आली. यात श्री साई महिला भजन मंडळ श्री गुरुदेव सेवा महिला मंडळ महाराणा प्रताप वार्ड श्री गुरुदेव सेवा महिला मंडळ झाकीर हुसेन वार्ड तसेच श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान जी यांची वेशभूषा धारण करून भव्य भजना सहित नाचत गाजत श्रीराम प्रभू चे जयघोष करीत दिंडी कलश पालखीचे साई मंदिर ते दत्त मंदिर साई फुलवाले तसेच मेन रोड वरून सौ शीला असुटकर यांच्या घरासमोरून परत साई मंदिरात कलश मिरवणूक आणण्यात आले.

यात सहभागी झालेले देव पुजारी, श्री साई मंदिराचे अध्यक्ष पी यु जरीले, ह.भ. प. काशिनाथ कोंडेकर महाराज, शंकर पुलगमवार, साई पिल्ले, गणपत राखुंडे, भास्कर शेळके, ललित पिल्ले, कौरासे, तुळशीराम प्रकाश झाडे, शरद गिरसावळे, प्रदीप भोरे, रामदास राखुंडे, भास्कर लांडे, विजय भोरे, वरारकर, राहुल पिल्ले, सौ. शशिकला कडू, श्रीमती कौशल्याबाई कुंठे, सौ. झुंगरे बाई, सौ.लक्ष्मीबाई आत्राम, सौ. सविता गौरकार, सौ. मत्ते, संदीप बोरीकर, २२ जानेवारी २०२४ ला श्रीराम प्रभू चे प्राण प्रतिष्ठाचे निमंत्रण अक्षदा मिरवणूक सोबत घरोघरी देण्यात आले. या मिरवणुकीमध्ये सर्व वार्डातील लोकांनी त्यात भाग घेऊन आरती करून सांगता करण्यात आले नंतर अल्पोहार व प्रसाद वितरण करण्यात आले.

Latest Posts

Don't Miss