विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ, नवी दिल्ली अंतर्गत मध आणि मधमाशी संबंधित अन्य उत्पादनांच्या योग्य स्त्रोताचा शोध घेण्याच्या दृष्टीने व अद्ययावत नोंदी ठेवण्यासाठी मधुक्रांती पोर्टल विकसित करण्यात आले आहे. https://madhukranti.in/nbb या वेबसाईटवर मधुमक्षिका पालकांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
नोंदणीमुळे मधुमक्षिका पालकांना होणारा लाभ –
मधुमक्षिका पालकाला नोंदणीकृत/मान्यताप्राप्त मधुमक्षिकापालक म्हणून ओळख मिळते. नोंदणी धारकांना १ लाखापर्यंत फ्री विमा उपलब्ध होतो. विना अडथळा मधुमक्षिका पेट्यांचे स्थलांतर.
नोंदणीवेळी आवश्यक कागदपत्रे –
आधार कार्ड (नाव, जन्मतारीख, पत्तासहित), आधार क्रमांकाशी जोडलेला अद्ययावत भ्रमणध्वनी क्रमांक, मधुमक्षिका पालनासंबंधित तपशील, मधुमक्षिका पालन प्रशिक्षण प्रमाणपत्राची सॉफ्ट प्रत तसेच मधुमक्षिका पालकाचा मधुमक्षिका पेट्यांसमवेत फोटो आवश्यक राहिल. तसेच लागणारे नोंदणी शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने अदा करता येईल.
स्व:मालकीच्या मधुमक्षिका पेट्यांमधील मधुमक्षिका वसाहतींची संख्या (१० फ्रेम) व भरावयाचे नोंदणी शुल्क –
० ते १०० फ्रेम करीता रु. २५०, १०१ ते २५० फ्रेम करीता रु. ५००, २५१ ते ५०० फ्रेम करीता रु. १ हजार, ५०१ ते १ हजार फ्रेम करीता रु. २ हजार, १ हजार १ ते २ हजार फ्रेम करीता रु. १० हजार, २ हजार १ ते ५ हजार फ्रेम करीता रु. २५ हजार, ५ हजार १ ते १० हजार फ्रेम करीता रु. १ लक्ष तर १० हजार पेक्षा अधिक फ्रेम करीता रु. २ लक्ष नोंदणी शुल्क भरावयाचे आहे.
तरी, जास्तीत जास्त मधुमक्षिकापालकांनी मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी राष्ट्रीय मधमाशी मंडळ, नवी दिल्ली ०११-२३३२५२६५,२३७१९०२५, मधुक्रांती पोर्टल Tech Support- १८००१०२५०२६ तसेच महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, पुणे (०२०) २९७०३२२८ या क्रमांकावर संपर्क साधावा.