Latest Posts

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड मध्ये बहुमताने मिळालेला विजय हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय : भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे

– जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या उपस्थितीमध्ये धानोरा येथे विजय जल्लोष साजरा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : धानोरा तालुका बैठक जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा बूथ विस्तारक प्रमुख दामोधर अरगेला व जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष सशिकांत साळवे यांच्या उपस्थिती मध्ये विश्राम गृह धानोरा येथे संपन्न झाली.

या बैठकीला तालुका अध्यक्षिका लता पुंघाटी, नवनियुक्त शहर अध्यक्ष सारंग साळवे, दिलीप बारसिंगे, रामदास गावंडे, तारा कोटोगले, पुंडलिक गावतुरे, आमित नरोटे, विजय कुंभरे, दिवाकर नैताम, मधुकर भैसारे, रेवण नरुले, गजानन आता मेश्राम, मुरारी उसेंडी, बाजीराव वालको व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचा निकाल रविवारी भाजपच्या बाजूने लागला. दुपारी साडे बारा वाजता निकाल स्पष्ट झाल्यानंतर धानोरा तालुका व शहर भाजपच्या वतीने मुख्य चौका मध्ये आनंदोत्सव साजरा करण्याचे ठरविले.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी बैठकीमध्ये बोलताना छत्तीसगड, राजस्थान, मध्ये प्रदेश जनतेचे आभार मानले व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलले की, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये मिळालेला विजय हा सर्वसमान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे. मोदी यांनी देशभरात केलेल्या विकास कामांमुळे जनतेचा त्यांच्यावरील विश्‍वास वाढला आहे. त्यांच्या हातात देश सुरक्षित आहे. मागील नऊ वर्षात त्यांनी देशात विकासकामे केली, विविध योजना आणून सर्वसामान्य जनतेला न्याय दिल्याने हा विजय मिळाला आहे. २०२४ च्या निवडणूकीतही भाजपला मोठे यश मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी केले.

Latest Posts

Don't Miss