– महावितरण, महापारेषण, महानिर्मिती व महाऊर्जा कंपन्यांची जिल्हा आढावा बैठक संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : विज ही मानवी गरज बनली आहे. त्यामुळे विज पुरवाठा करणा-या यंत्रणेची जबाबदारी वाढली आहे. अशात आपण उत्तम सेवा देण्यासाठी तत्पर असल पाहिजे. महावितरणमध्ये लाईनमॅनसह इतर अनेक पदे रिक्त आहे. त्यामुळे ही पदे तात्काळ भरल्या गेली पाहिजे अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. महावितरण कार्यालय येथे एमएसईबी सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांच्या प्रमूख उपस्थितीत महावितरण, महापारेषण, महानिर्मिती व महाऊर्जा या सरकारी कंपन्यांच्या जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीला राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, महानिर्मितीचे संचालक संजय मारूडकर, कार्यकारी संचालक पंकज सपाटे, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे, महानिर्मितीचे मुख्य अभियंता गिरिश कुमारवार, महापारेषणचे मुख्य अभियंता सतीश अणे उपस्थित होते.
चंद्रपूर हा विज उत्पादक जिल्हा आहे. त्यामुळे येथील वीज सेवा उत्तमच असली पाहिजे. विज ग्राहकांशी आपली वागणूक सौजन्यपूर्ण असली पाहिजे. त्यांच्या अडचणींचे निराकरण तात्काळ करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल पाहिजे. कमी मनुष्यबळ असूनही चांगली सेवा देण्यासाठी महावितरण ओळखली जाते.
आपण निर्माण केलेली ही ओळख कायम ठेवण्यासाठी परिश्रम घ्या. येथे अनेक पदे रिक्त आहेत. यात विद्युत सेवेचा मुख्य भाग असलेल्या लाइनमॅनचे जवळपास ५० हुन अधिक पदे रिक्त आहेत. ती भरण्याच्या दिशेने तातडीने प्रयत्न व्हावेत अशा सुचनाही या बैठकीत बोलाताना आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत. वडगाव प्रभागात विद्युत पुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता वडगाव येथे सब स्टेशन सुरु करण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.
सध्या विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार कमी झाले आहे. हे नक्कीच महावितरणचे यश आहे. मात्र विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी लागणारा कालावधी आणखी कमी करता येईल या दिशेने आपले प्रयत्न असले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. विद्युत शॉक लागण्याच्या घटनांवर अद्यापतरी आपण पुर्णत: अंकुश मिळवू शकलेलो नाही त्यामुळे आता विद्युत शॉकवर अंकुश लावण्यासाठी प्रत्येक विद्युत ग्राहकांकडे सुरक्षा यंत्र महावितरणने स्वखर्चातून लावण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. या बैठकीला संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.