Latest Posts

शेतकऱ्यांनी पिक प्रात्याक्षिके, प्रमाणित बियाणे वितरण करीता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके योजना रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या उत्पनामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने कृषि विभागा मार्फत पिक प्रात्याक्षिके, प्रमाणित बियाणे वितरण, एकात्मीक किड व रोग व्यवस्थापन, एकात्मीक अन्नद्रव्ये व्यवस्थापन या बाबी महाडीबीटी व्दारे राबविण्यात येत आहे. याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

पिक प्रात्याक्षिके करिता हेक्टरी रूपये ९ हजार अनुदान देय असून कडधान्य पिक-हरभरा व गळीतधान्य पिक जवस आणि करडई पिक प्रात्याक्षिके राबविण्याकरिता एका गावातून किमान २५ शेतक-यांचे अर्ज महाडीबीटीवर प्राप्त होणे अनिवार्य आहे. त्याशिवाय त्यांची लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येणार नाही.

प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रमांतर्गत शेतक-यांना कृषि केंद्रा मार्फत अनुदानावर अधिक उत्पादन देणारे सुधारित वाण (१० वर्षा आतील बियाणे) किंमतीच्या ५० % किंवा रूपये ५ हजसा प्रती क्विटल तसेच अधिक उत्पादन देणारे सुधारित वाण (२० वर्षा वरील बियाणे ) किंमतीच्या ५०% किंवा रूपये २ हजसा ५०० प्रती क्विटल याप्रमाणे अनूदान देय आहे. एकात्मीक अन्नद्रव्ये व्यवस्थापन अंतर्गत सुक्ष्म मूलद्रव्ये किंमतीच्या ५०% किंवा उच्चतम रुपये ५००/- हेक्टरी तसेच जैविक खते किंमतीच्या ५०% किंवा उच्चतम रूपये ३००/- हेक्टरी अनुदान देय आहे. एकात्मीक किड व रोग व्यवस्थापन अंतर्गत पिक संरक्षण औषधे किंमतीच्या ५०% किंवा उच्चतम रूपये ५०० हेक्टरी तसेच तणनाशके किंमतीच्या ५०% किंवा उच्चतम रूपये ५००/- हेक्टरी अनुदान देय आहे. वरील सर्व बाबीचा लाभ घेण्याकरिता शेतक-यांनी महाडीबीटी लाईट https://mahadbtmahait.gov.in/ वर वैयक्तीक / शेतकरी गट अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss