Latest Posts

महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मोठी कारवाई : ७० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे (Pune) : महादेव बेटिंग ॲप प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नारायणगावात पुणे ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून जवळपास ७० जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत या प्रकरणातील सगळ्यात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

परदेशासह देशातील इतर राज्यात झालेल्या छापेमारीनंतर महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपची कामे पुण्याच्या नारायणगावामधून सुरू असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नारायणगावात धाड टाकली आणि एका इमारतीतून जवळपास ७० जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आहे.

या संपूर्ण इमारतीत महादेव ॲपचे काम सुरू होते धक्कादायक माहिती समोर आली. नारायणगाव पोलीस याचा तपास पुढील तपास करत आहेत.

Latest Posts

Don't Miss