Latest Posts

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील आलापल्ली येथील प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठापणा निमित्त आलापल्ली येथील विविध कार्यक्रम आयोजित केली आहे. त्या निमित्त आलापल्ली लाडका राजा गणेश मंडळ व स्वराज्य फाउंडेशन तर्फे बस स्थानक ठिकाणी भाविकांना महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केला आहे.

त्या ठिकाणी आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी महाप्रसाद कार्यक्रमला उपस्थित दर्शवून मार्गदर्शन केली. तसेच भाविक भक्त जणांना माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आले.

यावेळी आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष तथा सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू मडावी, नागेपल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच सरोज किशोर दुर्गे, सागर रामगोनवार, कुणाल वर्धलवार, अतुल आत्राम, रुपेश श्रीरामवार, रिंकू आत्राम, स्वप्नील मडावी, नरेंद्र गर्गम, किशोर दुर्गे, चिंटू आत्राम, सचिन पांचर्य, जावेद खान, प्रमोद गोडशेलवार सह आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच लाडका राजा गणेश मंडळ – स्वराज्य फाउंडेशनचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss