Latest Posts

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकरिता जिल्ह्यातील कुस्ती पैलवानांनी निवड चाचणीसाठी सहभागी व्हावे : इंजि. प्रमोद पिपरे

– महाराष्ट्र केसरी गडचिरोली जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ पुण्याच्या मान्यतेनुसार गडचिरोली जिल्ह्यातील तालीम कुस्तीगीर संघाच्या वतीने २९ ऑक्टोबर २०२३ ला सकाळी ९.०० वाजता जिल्हास्तरीय निवड चाचणीचे आयोजन क्रीडा प्रबोधनी पोटेगाव रोड, गडचिरोली येथे केले आहे. महाराष्ट्र केसरी वरिष्ठ गटाची गडचिरोली जिल्हा तालीम कुस्तीगीर संघाची निवड चाचणी स्पर्धेत, गादी व माती प्रकारात वजन गट ५७ किलो,६१,६५,७०,७४,७९,८६,९२,९७ व महाराष्ट्र केसरी ८६ ते १२५ किलो वजन गटात निवड करण्यात येईल.

निवड झालेल्या स्पर्धकाला नोव्हेंबर महिन्यात फ़ुलगाव ता. हवेली जि. पुणे येथे होणाऱ्या वरीष्ठ गट राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा तसेच महाराष्ट्र केसरी करिता संधी मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कुस्ती पैलवानांनी निवड चाचणी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन तालीम कुस्तीगीर संघाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष इंजि. प्रमोद पिपरे यांनी केले आहे.

निवड चाचणी हि महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, चंद्रपूर शहर तालीम कुस्तीगीर संघाचे सचिव कुस्तीपंत धर्मशिव काटकर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

अधिक माहितीसाठी मो.नं.९८३४३६६८९८,९४२२१५३८३३,९४२३४१६५८५ येथे संपर्क करावे.

Latest Posts

Don't Miss