Latest Posts

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे बामनी प्रोटीन्स लिमिटेडला बंद करण्याचे निर्देश 

– राजेश वारलुजी बेले संस्थापक अध्यक्ष संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था चंद्रपूर यांनी केले तक्रार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballapur) : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) बामनी प्रोटीन्स लिमिटेडला जल आणि वायू प्रदूषण नियंत्रण कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

कंपनी कमी दर्जाचे सांडपाणी कंपनीच्या आवाराबाहेर सोडत आहे. एमपीसीबी अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात असे आढळून आले की, कंपनीने सांडपाणी टाकण्यासाठी पाइपलाइन टाकली होती आणि हे सांडपाणी नाल्यात सोडले जात होते.

कंपनीने एमपीसीबीच्या निर्देशांचे पालन केले नाही आणि प्रदूषण नियंत्रण उपकरणे बसवली नाहीत, अशी तक्रार देण्यात आली.

त्यानुसार एमपीसीबीने ७ मार्च २०२४ रोजी कंपनीला प्रस्तावित निर्देश जारी केले. कंपनीने ११ मार्च २०२४ रोजी उत्तर दिले, परंतु ते एमपीसीबीला समाधानकारक वाटले नाही. एमपीसीबीने १३ मार्च २०२४ रोजी कंपनीला तात्काळ बंद करण्याचे निर्देश जारी केले.

कंपनीने एमपीसीबीच्या निर्देशांचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. एमपीसीबीने वीज वितरण कंपनीला कंपनीचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश दिले आहेत. एमपीसीबीने उपप्रादेशिक अधिकारी यांना वरील निर्देशांचे पालन सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

या विषयी बामनी प्रोटीन्स लिमिटेडचे मानव संसाधन विकास विभाग चे सतीश मिश्रा यांनी सांगितले की कंपनी बंद केले असून कंपनी परिसरातील मागील भागातील कच्चा माल जमा करण्याचे काम सुरू आहे.

Latest Posts

Don't Miss