Latest Posts

महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार विलास चाकाटे यांनी शड्डू ठोकला : चिन्ह देखील मिळाला

विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया (Gondia): आमगाव – देवरी विधानसभा मतदारसंघ राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. महाविकास आघाडीत या जागेवरुन चर्चा सुरु असतानाच तत्कालीन आमदाराची टिकीट कापत नवख्या उमेदवाराला उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर तत्कालीन आमदार सहसराम कोरोटे यांनी कॉंग्रेस सोबत बंडखोरी न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, महाविकास आघाडीत असलेल्या मित्र पक्षातील म्हणजेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील विलास चाकाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत बंडखोरी केली आहे. ज्यामुळे या विधानसभा निवडणूकीत चाकाटे यांच्या पाठिशी उभे कोण? हा प्रश्न महाविकास आघाडीतील उमेदवाराला पडला असून पक्ष श्रेष्टीने उमेदवारी नाकारलेले कोरोटे हे नवख्या उमेदवाराला मदत करणार की नाही? अशा चर्चाही रंगू लागल्या आहेत.

चाकाटे यांना चिन्ह कोणते ?

आमगाव – देवरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार विलास चाकाटे यांना फळांची टोपली चिन्ह मिळालं आहे.

कोणता पॅटर्न राबवणार – विलास चाकाटे

मला अर्ज कायम ठेवण्यासाठी मला माझ्या कार्यकर्त्यानी, समाजातील नागरीकांनी व माझ्यासोबत जुडलेल्या सर्व संघटनांनी सांगीतल आहे. मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहे, असेही विलास चाकाटे म्हणाले.

तर आता आमगाव विधानसभेत तिरंगी लढत – 

आमगाव विधानसभेत तिहेरी लढत होईल, असा दावा देखील चाकाटे यांनी केला. विलास चाकाटे यांच्या उमेदवारीमुळे आमगाव – देवरी विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे. आमगाव विधानसभा मतदार संघात भाजपच्या संजय पुराम, कॉंग्रेसचे राजकुमार पुराम आणि बंडखोर विलास चाकाटे यांच्यात लढत होणार आहे.

मित्र पक्षातिल पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सोसल मिडीयाच्या माध्यमाने राग व्यक्त, महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार विलास चाकाटे यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळाला.

आमगाव विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे निवडणूकीच्या वेळेवरही ऐकला चलो रे चे काम सुरू आहे. ज्यामुळे आमगाव मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यात नवख्या उमेदवारा विरोधात चागंलीच नाराजी कायम आहे. ज्यामुळे विलास चाकाटे यानां याचा चांगला फायदा होणार असुन पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची साथ विलास चाकाटे यानां मिळनार आहे. ज्याचा नुकसान महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होणार असुन, आमगाव विधानसभा मतददार संघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या भावना सोसल मिडीयातुन व्यक्त केले आहे.

Latest Posts

Don't Miss