Latest Posts

मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी स्व. अरविंद खोब्रागडे यांच्या कुटुंबियांची घेतले भेट

– वृत्तपत्र सृष्टीतील चमकता तारा निखळल्याचे शोकसंदेश व्यक्त केले
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : राज्याचे अन्न व ओषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी मंगळवार रोजी स्व. अरविंद खोब्रागडे यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतले.

एका दैनिक वृत्तपत्राचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी अरविंद खोब्रागडे यांचे आजाराने गुरुवार ९ नोव्हेबर रोजी नागपुरच्या हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले होते. त्यामुळे राज्याचे मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी स्व. अरविंद खोब्रागडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन खोब्रागडे कुटुंबियांच्या दुःखात सामील असून कुटुंबियांच्या सदैव पाठीशी असल्याचे सांगितले.

सांत्वनपर भेटीत मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी, अरविंद खोब्रागडे अगदी कमी वयात गेल्याचे फार मोठे दुःख असून अरविंदच्या जाण्याने व्यक्तिशः माझा सच्चा व खंदा समर्थक गेल्याचे शल्य असून त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील वृत्तपत्र सृष्टीचा चमकता तारा निखळल्याचे शोकसंदेश व्यक्त केले.

तसेच मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी स्व. अरविंद खोब्रागडे यांच्या पत्नी लता खोब्रागडे, मनीष व गीतेश खोब्रागडे व परिवारातील अन्य सदस्यांशी संवाद साधले.

यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, आकाश पगाड़े, कुणाल चिलगेलवार, हिमांशु खरवड़े आदी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss