Latest Posts

गडचिरोलीचे तन्मय आणि संप्रेक्षा झळकले मराठी म्युझिक अल्बम मध्ये

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली शहरातील दोन बाल कलाकार तन्मय उंदीरवाडे या संप्रेक्षा खोब्रागडे यांनी तू माझा सारथी या नवीन मराठी म्युझिक अल्बममध्ये चमक दाखवून शहराचे नाव लौकिक केले आहे.

मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संपूर्ण जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा आणि सन्मानाचा क्षण आहे. हा अल्बम सुप्रसिद्ध जेएसव्ही म्युझिक प्रॉडक्शन तर्फे यू ट्यूब चॅनलवर नुकताच प्रदर्शित  करण्यात आला आहे आहे.

गणेश व्यवहारे, आर.जे. भावना, प्रिती रंगारी आणि प्रकाश रंगारी हे या अल्बममधील इतर कलाकार आहेत. अभिनव कात्यायन हे दिग्दर्शक आणि  ज्योती उंदिरवाडे या कास्टिंग डायरेक्टर आहेत. जगदीश गोमिला आणि आशिष भांदककर हे अल्बमचे संगीत दिग्दर्शक असून सारेगामा विजेते रुषिकेश रानडे आणि निहिरा जोशी देशपांडे हे गायक आहेत.

सुप्रसिद्ध फॅशन आर्टिस्ट आणि जेटीएम स्टार इव्हेंटच्या संचालिका श्रीमती ज्योती उंदिरवाडे आणि प्रेषित खोब्रागडे हे संगीत अल्बमचे प्रायोजक आहेत. तन्मय आणि संप्रेक्षा या बालकलाकारांच्या अभिनयाचे येथील सांस्कृतिक व मनोरंजन क्षेत्रात  कौतुक होत आहे.

Latest Posts

Don't Miss