Latest Posts

मारबर्ग व्हायरसमुळे १५ जणांचा मृत्यू : १७ देशांमध्ये अलर्ट जारी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यातून रक्त येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण, हे त्या व्यक्तीसाठी घातक ठरू शकते. सध्या आफ्रिकन देश रवांडामध्ये मारबर्ग वायरस पसरला आहे. याठिकाणी या वायरसने मोठा कहर केला आहे. आतापर्यंत शेकडो लोकांना याचा फटका बसला असून १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

या वायरसचा धोका पाहता जवळपास १७ देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मारबर्ग वायरसमुळे लोकांच्या डोळ्यांतून पाण्यासारखे रक्त बाहेर येते. यामुळेच याला ब्लीडिंग आय वायरस (Bleeding Eye Virus) असेही म्हणतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) रिपोर्टनुसार, हा वायरस इबोला व्हायरस संबंधित आहे. त्यामुळे वायरस हेमोरेजिक तापही येतो. मारबर्ग वायरस लोकांच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतो आणि त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होतो. हा एक जुनोटिक वायरस आहे, म्हणजेच तो प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो. हा विशेषता वटवाघळांपासून उद्भवतो आणि वटवाघळांच्या रक्त, मूत्र किंवा लाळेच्या संपर्काद्वारे मानवांमध्ये पसरते. हा वायरस सर्वात आधी १९६१ मध्ये जर्मनीतील फ्रँकफर्टमध्ये आढळला होता.

वायरसची लक्षणे –
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, मारबर्ग  वायरसची लक्षणे इबोला वायरससारखी आहेत.जेव्हा या वायरसचा संसर्ग होतो तेव्हा लोकांना खूप ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखणे, उलट्या, घसा खवखवणे, पुरळ उठणे आणि जुलाब यासारख्या समस्या होऊ शकतात. याशिवाय या त्रासामुळे अंतर्गत रक्तस्राव आणि अवयव निकामी होतात. या वायरसची लागण झाल्यावर अचानक वजन कमी होणे, नाक, डोळे, तोंड किंवा योनीतून रक्त येणे आणि मानसिक गोंधळ यांसारख्या समस्या उद्भवतात.

काय काळजी घ्यावी?
मारबर्ग वायरस संक्रमित लोकांच्या संपर्कातून पसरतो. डॉक्टरांच्या मते, शरीरातील द्रवपदार्थांद्वारे तो इतर लोकांमध्ये पसरतो. हे टाळण्यासाठी, संक्रमित लोकांपासून दूर रहा. सामाजिक अंतर ठेवा, मास्क वापरा आणि वारंवार हात धुवा.

Latest Posts

Don't Miss