विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात १०२ रुग्णवाहिकेवर कंत्राटी पध्दतीने वाहन चालकांची नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांच्या न्यायोचित मागण्या पूर्ण करण्या करीता संघटनेकडून शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा शासन याकडे दुर्लक्ष करून मागण्याची दखल घेत नसल्यामुळे १८ डिसेंबर २०२३ ला विधान भवन नागपूर येथे राज्यातील संपूर्ण १०२ रुग्णवाहिका चालक बेमुदत संपावर जाणार असल्याचे रुग्णवाहिका चालकांनी कळविले आहे.
रुग्णवाहिका संघटनेच्या मागण्या :
१) राज्यातील सर्व १०२ रुग्णवाहिका चालकांना विनाशर्त शासकीय सेवेत सामावून घ्यावे व नियमाप्रमाणे वेतन व भत्ते देण्यात यावे.
२) १०२ रुग्णवाहिका चालकांची नियुक्ती बाह्य स्रोतांकडून (ठेकेदारा मार्फत ) करण्याची पद्धत तात्काळ बंद करण्यात यावी.
३) १०२ रुग्णवाहिका चालक हे २४ × ७ सेवा देत असल्यामुळे पुरेशी झोप न झाल्याने किंवा रुग्णसेवा हि आकस्मिक सेवा असल्याने कामाच्या व्यस्थेतेमुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने कामाचे तास हे ८ तास करण्यात यावे.
४) कामाच्या व्यापामुळे पुरेशी झोप किंवा पुरेसा आरामा अभावी अपघात झाल्यास किंवा मुत्यू झाल्यास वाहन चालकांना विमा कवच देण्यात यावे.
५) आठवड्यातून एक दिवस सुट्टी व शासकीय नियमाप्रमाणे १४ दिवस किरकोळ राजा देण्यात यावे.
६) मोबाईल भत्ता देण्यात यावे.
इत्यादी मागण्या करिता नागपूर विभागातील १०२ रुग्णवाहिका चालक १८ डिसेंबर २०२३ रोजी विधान भवन नागपूर येथे सहभागी होत आहोत.